आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राडा करणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - हनुमानव्यायाम प्रसारक मंडळामध्ये शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमाला शिकणाऱ्या परराज्यातील विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये शनिवारी झालेल्या मारहाण प्रकरणामधील पाच विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. घटनेमध्ये सात जण जखमी झाले होते. या प्रकरणी, परस्परांविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारींवरून पोलिसांनी शनिवारी एकाला, तर रविवारी चौघांना अटक केली आहे.
राजापेठ पोलिसांनी अटक केलेले पाचही विद्यार्थी हे एकाच गटातील असून, ते मूळ दिल्ली येथील रहिवासी आहेत. त्यांच्याविरुद्ध प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे, तर दुसऱ्या गटाविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल झाला. दोन्ही गटांतील विद्यार्थ्यांची नावे शनिवारी समोर आले नव्हते. मात्र, पोलिसांच्या चौकशीअंती रविवारी चार नावे स्पष्ट झाल्यावर सायंकाळी त्यांना अटक करण्यात आली. शनिवारी वादावेळी वसतिगृहामध्येही तोडफोड झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, जखमींवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणामध्ये आणखी काही जणांना अटक होणार आहे, त्या संदर्भात राजापेठ पोलिस चौकशी करत आहे. यापूर्वी कधीही अशा प्रकारे पोलिसांची कारवाई या संस्थेतील विद्यार्थ्यांवर झाली नव्हती, असे समजते. शनिवारी विद्यार्थ्यांनी राडा केल्यामुळे िशस्तीला गालबोट लागल्याची चर्चा आहे.