आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 5 Thousand Ink Bottle Using Bu Election At Amravti

पाच हजार शाई बॉटल्समधून मतदानाचा हक्क

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्‍हातील आठ विधानसभा मतदारसंघांतील ५०९ मतदान केंद्रांवर सुमारे पाच हजार शाईच्या बॉटल्स लागतील. मतदान केल्याची ओळख दर्शवणारी ही म्हैसूर शाई जिल्‍हातील जवळपास २२ लाख सहा हजार २८८ मतदारांच्या बोटांवर लागणार आहे.

प्रत्येक मतदार केंद्राला या शाईच्या दोन बॉटल्स देण्यात येतात. एका बॉटलमधील सुमारे एक हजार मतदार मतदानाचा हक्क बजावू शकतील, असे तज्ज्ञांनी सांगितले. निवडणूक आयोगाने नुकताच विधानसभा निवडणूक कार्यक्रम घोषित केला असून, जिल्‍हा निवडणूक प्रशासनाला स्टेशनरी मिळण्यास सुरुवात झाली आहे. जांभळ्या रंगाची ही इलेक्शन शाई तर्जनीवर लावल्याबरोबर जांभळ्या रंगाचे रूपांतर काळ्या रंगात होते.

मतदानातील गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी तसेच पुनर्मतदान टाळण्यासाठी या शाईचा वापर केला जातो. त्यामुळे निवडणुकीत या शाईची भूमिका महत्त्वाची असते. राज्य निवडणूक आयोगाकडून या बॉटल्स पुरवल्या जात असून, प्रत्येक बॉटलमध्ये दहा मिलिमीटर शाई असते. या शाईचा उपयोग केवळ निवडणुकीसाठी करण्यात येत असून, बाजारात कोठेही ही शाई िवकत मिळत नाही.

म्हैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेड कंपनी ही शाई तयार करते. राज्य निवडणूक आयोगाकडून प्रत्येक जिल्‍हातील मतदान केंद्रांनुसार या शाईचे वाटप करण्यात येते, असे सूत्रांनी सांगितले.

स्टेशनरी मिळायला सुरुवात झाली
विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काही दिवसांतच मतदानासाठी लागणारी स्टेशनरी मिळायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात सध्या २,५०९ मतदान केंद्रे आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर दोन बॉटल्स याप्रमाणे शाई बॉटल्स उपलब्ध असणार आहे. रवींद्रधुरजड, उपजिल्हाधिकारी निवडणूक.
शाईत सिल्व्हर नायट्रेटचा वापर
मतदानप्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या शाईमध्ये सिल्‍व्‍हर नायट्रेट घटक असल्याने तत्काळ ओळखता येतो. बाहेरील त्वचेतील पेशी जोपर्यंत पुसल्या जात नाहीत, तोपर्यंत शाईचा रंग पुसला जात नाही. शाईच्या घटकात सिल्‍व्‍हर नायट्रेटचे प्रमाण दहा, चौदा अठरा टक्के असतो. दरम्यान, एकाच बॉटलमधील शाई हजारो मतदारांच्या बोटांवर लावली जाते. एका मतदारापासून दुसऱ्या मतदारांच्या बोटांवर विषाणू जाऊ नयेत, यासाठी बायोसाइडसाठी हे रसायन वापरले जाते.