आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेथकडून ५० एड्सग्रस्त चिमुकल्यांना शैक्षणिक साहित्य भेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(विध्‍याथ्‍यांना शैक्षणिक साहित्य भेट देतांना फेथ सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा पूजा उमेकर. )
अमरावती- ५०एड्सग्रस्त चिमुकल्यांना नोटबुक, स्कूल बँग कंपास बॉक्स, रबर, पेन पेन्सिल आदी शैक्षणिक साहित्य भेट देऊन फेथ फांऊडेशन या स्वयंसेवी संस्थेने निरागस चेहऱ्यांवर हसू फुलविले आहे.
हा स्तुत्य आणि सामाजिक उपक्रम पूजा उमेकर यांच्या फेथ फाऊंडेशन या संस्थेने संस्थेतील सदस्यांनी हाती घेतला असून, या ५० एड्सग्रस्त मुलांना या संस्थेने दत्तकसुद्धा घेतले आहे. शाळा सुरु होण्यापूर्वी या मुलांच्या वस्तीमध्ये जाऊन एका छोटेखानी कार्यक्रमात या एचआयव्हीबाधीत मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
दरम्यान, हा कार्यक्रम घेण्यापूर्वी या मुलांसाठी खेळांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विविध खेळात या मुलांनी सहभागी होऊन मनसोक्त खेळाचा आनंद घेतला. त्यानंतर मुलांना चॉकलेट बिस्किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी मुलांनी कार्यक्रमात उस्फूर्तपणे सहभागी होऊन फेथ संस्थेच्या सदस्यांसोबत मिळून-मिसळून खेळण्याचा आनंद घेतला. यापूर्वी संस्थेचे याचप्रमाणे पारधी बेड्यावरील मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलविले होते. याशिवाय त्यांना आरोग्य शिक्षणासोबतच स्वच्छतेसंदर्भात माहिती देण्यात आली होती. यावेळी फेथ संस्थेच्या पूजा उमेकर, अमोल पाटील, उदय बोंद्रे, देवश्री देशमुख इतर सदस्य उपस्थित होते.

मतदान नोंदणी अभियान, कागदी पिशवीचे वाटप अभियान, लेक वाचवा अभियान, गरजू वंचित मुलांना विविध साहित्यांचे वाटप, पारधी बेड्यांवरील मुलांना शिक्षण साहित्याचे वाटप शिक्षण देणे आदी विविध सेवाभावी तथा समाजपयोगी उपक्रम संस्थेने राबविले आहेत. याशिवाय वृद्धाश्रम बालसुधारगृहात काही क्षण घालवून त्यांना आनंद देण्याचे काम केले आहे.
इतर चिमुकले जसे खेळण्याबागळण्याचा आनंद घेतात, त्याचप्रमाणे या एड्सग्रस्त मुलांनाही मौजमज्जा करावी वाटते. परंतु समाजाच्या संकुचित विचारामुळे या मुलांना किंवा अशा लोकांना वेगळे ठेवण्यात येते. त्यामुळे असे मुले या आनंदापासून कोसो दूर आहेत. परंतु फेथने त्यांना प्रवाहात आणून मौजमज्जेचा आनंद दिला आहे.
प्रत्येक महिन्यात या मुलांसाठी ही संस्था विविध कार्यक्रमांचे आयोजन करते. कधी त्यांच्यासाठी खेळांचे आयोजन केले जाते. तर कधी चॉकलेट बिस्किटचे वाटप करुन त्यांच्या आनंद द्विगुणीत केला जातो.
मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करताना फेथ सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा पूजा उमेकर.