आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष: अमरावतीमध्‍ये ५० कोटींच्या पाण्याची ‘वाट’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - आगामीवीस वर्षांतील पेयजलाची गरज लक्षात घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने वाढीव पाणीपुरवठा योजनांचा प्रस्ताव शासनदरबारी पाठवला आहे. मात्र, त्या प्रस्तावांना अद्याप मंजुरी मिळाली नाही. अमरावती महापालिका क्षेत्रातील ४४.४४ कोटींच्या योजनेचा त्यामध्ये समावेश आहे.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान कार्यक्रमांतर्गत शहरासाठीची पाणीपुरवठा योजना प्रशासकीय मंजुरीसाठी पाठवण्यात आली आहे. मंत्रालयात नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे २५ फेब्रुवारी, २० १४ मध्ये झालेल्या बैठकीत पाणीपुरवठा योजनेचे प्रस्ताव ठेवण्यात आले होते. मात्र, मंजुरी मिळाली नव्हती. पेयजल हा सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असलेला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे.जिल्‍ह्यामध्ये पेयजलासाठी लागणाऱ्या पाण्याची सध्या टंचाई नाही. मात्र, राजकीय प्रशासकीय औदासीन्यामुळे जनतेवर शुद्ध पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकतेच अमरावतीजिल्‍ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांच्यासमोर योजनेबाबत मांडणी करण्यात आली होती. राज्यामध्ये सत्ताबदल झाल्यामुळेजिल्‍ह्यातील पेयजलासंबंधीच्या योजनांचा मार्ग प्रशस्त होणार काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
पुढे काय?
महाराष्ट्रजीवन प्रािधकरण विभागाकडून पाठवण्यात आलेल्या योजनांना शासनाकडून मंजुरी मिळाल्यास जिल्ह्याच्या काही भागातील आगामी २० वर्षांतील पाण्याची समस्या दूर होईल, असे मत शहरातील तज्ज्ञांनी व्यक्त केले अाहे; अन्यथा भीषण पाणीटंचाईला सामाेरे जावे लागणार अाहे.
पाणी हेच जीवन असल्याचे म्हटले जाते. मात्र, जनतेला पाणी मिळावे म्हणून ५०.६४ कोटी रुपयांची ‘वाट’ पाहण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून योजना तयार आहे. मात्र, शासनदरबारी मार्ग मोकळा झाला नसल्यामुळे भविष्यात पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ नागरिकांवर येणार आहे. यामध्ये अमरावती, िचखलदरा अंजनगावसुर्जी येथील योजनांचासुद्धा समावेश आहे.
जलसंकट : तीन मोठ्या पाणीपुरवठा योजना रखडल्या; शासनाच्या मंजुरीची प्रतीक्षा
योजनेत समाविष्ट असणारी कामे
*वितरणव्यवस्था : ७७किमी वितरण व्यवस्था (एचडीपीई/डीआय) नव्याने टाकणे १९२ किमी वितरण व्यवस्था बदलणे.
* जलशुद्धिकरणकेंद्र : क्षमता३२ एमएलडी
* साठवणटाक्या : दोनउंच साठवण टाक्या (बडनेरा नागपुरी गेट) क्षमता २० लाख लिटर, दोन जमिनीवरील साठवण टाक्या (भीमटेकडी मालटेकडी) क्षमता १५ लाख लिटर
* ट्रान्समिशनमेन : डीआयपाइप्स व्यास ३००, ४००, ५०० मि.मी.
* ७५०एचपीचे : सहाव्हीटी पंप बदलवणे
* ९५एमएलडी : जलशुद्धीकरणकेंद्राची दुरुस्ती
* शुद्धपाणी पंपिंग मशिनरी : ४०एचपीचा नवीन पंप
* फ्लोमीटर बसवणे
* डाटा सेंटर व्यवस्था
* पॉझिटिव्ह सक्शन व्यवस्था
* जुन्या ग्राहकांचे ‘कनेक्शन’ विस्थापित करणे