आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२००५ पूर्वीच्या नोटा बदलण्यासाठी उरले सहा दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २००५ पूर्वीच्या नोटा चलनातून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे. या नोटा बदलण्यासाठी ३० जून ही शेवटची तारीख असून ग्राहकांना या नोटा अदलाबदल करण्यासाठी केवळ सहा दिवस शिल्लक राहिले आहेत.
३० जूननंतर नोट बदलण्याची प्रक्रिया ही किचकट असून ग्राहकांनी मुदतीपूर्वीच नोटांची बदली करावी, असे आवाहन राष्ट्रीयकृत बँकांनी केले आहे. दरम्यान, २००५ पर्यंत आरबीआयने तयार केलेल्या नोटांचे मुल्य हे लाख कोटी इतके होते. परंतु २०१३ डिसेंबरपर्यंत याची किंमत १२ लाख कोटी इतके झाले होते. यामध्ये तब्बल लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, इतक्या नाेटा आरबीआयने छापल्याच नाही. बाजारपेठेतील लपविलेला काळा पैसा बाहेर निघाला किंवा बनावट नोटांचे प्रमाण वाढले हेच याचे मुख्य कारण आहे. हा संपुर्ण गैरप्रकार टाळण्यासाठी आरबीआयने हा निर्णय घेतल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. काळा पैसा बनावटी नोटांचा काळाबाजार रोखण्यासाठी आरबीआयने २००५ पूर्वीच्या चलनातील नोट बंद करण्याचा निर्णय घेतला होता. जानेवारी २०१४ मध्ये आरबीआयने हा निर्णय घेतला होता.
प्रतिकात्मक नोट
ग्राहकाला जर नोट बदलायची असले तर, त्याचे बँकेत खाते असणे गरजेचे आहे. जर बँकेत खाते नसेल तर ग्राहकाला आपले आेळखपत्र अॅड्रेस प्रुफ बँकेला दाखवणे अनिवार्य आहे. विशेष म्हणजे, ५० हजार रुपयांपेक्षा जास्त नोटा बदलायच्या असतील, तर त्याला आपले पॅनकार्ड सुद्धा बँकेत सादर करावे लागणार आहे. ही नोट बदलण्यासाठी ग्राहकाला ज्या बँकेत खाते आहे, तेथे जाऊन पैसे भरण्याची स्लिप भरावी लागेल. त्यानंतरच त्याला ही नोट बदलून मिळणार आहे.
नोटा तत्काळ बदलाव्यात
^२००५पूर्वीच्या नोटा या सुरक्षित नाहीत. विशेष म्हणजे, ही नोट बदलण्यासाठी आरबीआयने नोट छापल्याचे वर्ष दिलेले नाही. त्यामुळे ग्राहकांना ती सहजरित्या आेळखता येईल. सर्वच राष्ट्रीयीकृत बँकेत ही सुविधा आहे. एसबीआय शाखेत बुधवारी ग्राहकांना ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. एका ग्राहकाला १० नोटा बदलता येईल. प्रदीपकराडे, अधिकारी, एसबीआय

३० जूननंतर काय करावे
एकरुपयांपासून ते हजाररुपयांपर्यंतच्या सर्वच २००५ पूर्वीच्या नोटा बँकेला परत करण्याचे आदेश आरबीआयने दिले होते. ३० जूननंतर एखादा ग्राहक या नोट बदलण्यासाठी बँकेत गेला तर त्याचे कुठल्याही नँशनलाईज बँकेत खाते असणे गरजेचे आहे. याशिवाय ग्राहकांना आेळखपत्र घराच्या पत्त्याची आेळख घेऊन जाणे बंधनकारक राहणार आहे. या कटकटीपासून त्रास वाचवण्यासाठी ३० जूनपूर्वीच ग्राहकांनी अापल्याकडील २००५ पूर्वीच्या नाेटा बदलाव्यात, असे अावाहन शहरातील राष्ट्रीयीकृत बँकांनी केले आहे.
बातम्या आणखी आहेत...