आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सहा हजार उमेदवारांनी दिली एमपीएससीची परीक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - महाराष्ट्रलोकसेवा आयोगाकडून रविवारी शहरात घेण्यात आलेल्या सहायक विक्रीकर निरीक्षकपदासाठी सहा हजारांवर उमेदवारांनी आपले नशीब अजमावले. विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी परीक्षा केंद्र असल्याने अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील परीक्षार्थी मोठ्या संख्येने परीक्षेसाठी आले होते. निवासी उपजिल्हाधिकारी तेजूसिंग पवार यांच्यासह जवळपास सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, महसूल अधिकारी, कर्मचा-यांनी परीक्षेत सहभाग घेतला.

या अधिका-यांनी परीक्षा केंद्र प्रमुख, पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले. लोकसेवा आयोगाची परीक्षा असल्याने केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले होते.
परीक्षा केंद्राच्या परीसरातील झेरॉक्स सेंटर, इंटरनेट कॅफे आदी बंद ठेवण्यात आले होते. सकाळी दहापासून परीक्षेला सुरुवात झाली. दुपारी दोनच्या सुमारास परीक्षा संपली. परीक्षेदरम्यान कोठेही उमेदवारांची गैरसोय किंवा गैरप्रकार झाल्याचे वृत्त नाही. परीक्षेच्या निमित्ताने शहरात आलेल्या उमेदवारांमुळे हॉटेल आणि ऑटो चालकांचा व्यवसाय ब-यापैकी झाला.

एक नजर परीक्षेवर
एकूणपरीक्षार्थी : ८,११२
उपस्थिती : ६,३००
एकूण केंद्र : २४
एकूण खोल्या : ३३८
तैनात कर्मचारी : ६३०

प्रक्रिया पूर्णपणे सुरळीत
प्रक्रियापूर्णपणेसुरळीत पार पडली. कोठेही उमेदवारांची गैरसोय झाली नाही वा कुणी गैरप्रकार केल्याचीही नोंद नाही. तेजूसिंगपवार, निवासी उपजिल्हाधिकारी.