आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहरात २४ तासांत घडले सात अपघात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातीलविविध भागांत २४ तासांत सात अपघात घडले. यातील चार अपघात राजापेठ आणि शहर कोतवाली पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील आहेत. सिद्धार्थ मंगलम कार्यालयापुढे एमएच २७ | एएम ८४६० क्रमांकाच्या वाहनाने विवेक रामदास वरडे हे जात होते. त्या वेळी एमएच. २७ | एआर ७१५५ क्रमांकाच्या इंडिका व्हिस्टा कारने त्यांना धडक दिली. दुसरा अपघात राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतच श्रेयस मोटर्सजवळ घडला. मनीषा गिरीश सराफ या एमएच २७ | एझेड ४३०७ क्रमांकाच्या प्लेझरने जात असताना त्यांना एमएच २७ | एपी ५१२६ क्रमांकाच्या बजाज पल्सरने धडक दिली. नागपुरी गेट परिसरात असलेल्या ताजनगरात अन्वर बेग बशीर बेग यांच्या सात वर्षीय मुलास एमएच २७ | एजी ७९८८ क्रमांकाच्या दुचाकीने धडक दिली. फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोतीनगरातही अपघात घडला. यात महिला जखमी झाली. त्यांचा मुलगा संजय सावळे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली. राजपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत समर्थ हायस्कूलजवळही दोन वाहनांची धडक झाली. दोन अपघातांची पोलिसांकडे तक्रार देण्यात आली नाही.