आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्रपती पुरस्कारासाठी अंबानगरीतून सात दावेदार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - गुणवानखेळाडूंची भरमार असलेल्या अंबानगरीतून यंदा राज्याच्या क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे एकूण सात अर्ज प्राप्त झाले आहेत. यात एक क्रीडा मार्गदर्शक आणि सहा खेळाडूंचा समावेश आहे. त्यात एक आंतरराष्ट्रीय खेळाडूही आहे. जलतरण (वॉटरपोलो), धनुर्विद्या, बुद्धिबळ आणि आट्यापाट्या या चार खेळांसाठी हे अर्ज सादर करण्यात आलेत.

स्केटिंगसाठी खेळाडूसह क्रीडा मार्गदर्शकाने अर्ज सादर केला आहे. यंदा प्रथमच खेळाडंूच्या फाइल्स राज्य क्रीडा युवक संचालनालयाकडे अंतिम तपासणीसाठी जाणार नाहीत, तर पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्यांची माहिती ऑनलाइन पाठवायची आहे. उर्वरितपान
श्याम भोकरे (क्रीडा मार्गदर्शक) : एकातपापेक्षाही जास्त काळ रोलर स्केटिंग या खेळासाठी राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू त्यांनी घडवलेत. ते जिल्हा रोलर स्केटिंग संघटनेचे सचिव असून, ते जिल्हा क्रीडा पुरस्कार विजेते आहेत.

पूजाकोसे (जलतरणपटू) : एचव्हीपीएमयेथील जलतरण केंद्रावर घडलेली पूजा कोसे ही अर्ज सादर करणारी एकमेव आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. तिने २०१३ मध्ये सिंगापूर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय वॉटरपोलो स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून कांस्यपदक जिंकले होते. शिवाय तिला नुकत्याच भोपाळ येथील राष्ट्रीय स्पर्धेतही पदक मिळाले.

तुषारशेळके (धनुर्धर) : २०१३च्या अखिल भारतीय धनुर्विद्या स्पर्धेतील इंडियन राउंड प्रकारात अमरावती विद्यापीठाला सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या धनुर्धराने राष्ट्रीय स्पर्धांमध्येही पदकांची लूट केली आहे. त्याला जिल्हा क्रीडा पुरस्कारही मिळाला आहे.

स्वप्निल धोपाडे (बुद्धिबळपटू) :२००३-०७ मध्ये विश्व शालेय बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा अन् सध्या २३०० च्या वर फीडे आंतरराष्ट्रीय रेटिंग असलेला अमरावतीतील एकमेव ग्रँडमास्टर आहे. या बुद्धिबळपटूने अनेक राष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या. नीता रंगे, वृशाली गुल्हाने, पूजा बाभूळकर या तिघींनी आट्यापाट्या या खेळात राज्य, राष्ट्रीय अन् विद्यापीठ स्पर्धा गाजवल्या आहेत. या तिघींनीही एकाच खेळात पुरस्कारासाठी अर्ज सादर केले आहेत.

दोन वर्षांसाठीचे आले हे अर्ज
यंदाआलेले अर्ज हे २०१२-१३ २०१३-१४ या दोन क्रीडा वर्षांसाठी असून, या कालावधीत खेळाडूंनी राष्ट्रीय आंतराष्ट्रीय स्पर्धेत केलेल्या दर्जेदार कामगिरीच्या आधारावर त्यांना पुरस्कार दिले जातील. अमरावतीतून यंदा मोठ्याठ्या प्रमाणावर अर्ज प्राप्त झाले असून, ते शासनाकडे पाठवले जातील. अविनाशपुंड, जिल्हाक्रीडा अधिकारी.