आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुकलीशी असभ्य वर्तन, ८० वर्षीय वृद्धाला शिक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- मोर्शीतालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ८० वर्षीय वृद्धाने सात वर्षीय चिमुकलीसोबत दोन वर्षांपुर्वी असभ्य वर्तन केले होते. या प्रकरणी न्यायालयाने दोषी वृद्धाला दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. हा निर्णय येथील जिल्हा सत्र न्यायाधिश (क्रमांक ४) एस. एम. भोसले यांच्या न्यायालयाने शुक्रवारी सुनावला.

गणपत बकारामजी खडसे (८०) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. फेब्रुवारी २०१३ ला दुपारच्यावेळी एक सात वर्षीय चिमुकली दुकानात जात होती. त्याचवेळी खडसे याने त्या चिमुकलीला चाॅकलेट देण्याचे अमिष दाखवले. यानंतर ही चिमुकली त्या वृद्धासोबत गेली. त्याने स्वत:च्या घरात नेवून चिमुकलीसोबत असभ्य वर्तन केले. त्यावेळी चिमुकलीने स्वत:चा बचाव करत त्याठिकाणाहून पळ काढला. ती धावतच घरी गेली. तीने हा घटनाक्रम आईला घरातील मंडळींना सांगितला. त्याच दिवशी सायंकाळी चिमुकलीच्या वडीलांनी शिरखेड पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.