आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भातील ८५ टक्के सिंचन विहिरी रद्द

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमरावती - विविध कारणांमुळे राज्यभरातील ३३ जिल्ह्यांत रद्द करण्यात आलेल्या धडक सिंचन विहिंरीमध्ये ८५ टक्के विहिरी या विदर्भातील ११ जिल्ह्यांतील आसल्याची धक्कादायक माहिती आहे, तर यापैकी रद्द करण्यात आलेल्या सर्वाधिक ६३ टक्के विहिरी या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील आहेत. उर्वरित महाराष्ट्रात २२ जिल्ह्यांतील रद्द करण्यात आलेल्या विहिरींची टक्केवारी केवळ १५ टक्के एवढीच आहे. यासंदर्भात आमरावती विभागाचे रोजगार हमी योजनेचे उपायुक्त एस. टी. टांकसाळे यांना विचारले आसता त्यांनी सांगितले की, विभागात रद्द करण्यात आलेल्या विहिरींचे पुनर्निधारण करण्याचे काम सुरू आहे. यातील आधिकाआधिक विहिरी पूर्ण करण्याचे प्रयत्न आहेत, आसेही टांकसाळे यांनी सांगितले.

जलयुक्त शिवार आंतर्गत सुरू आसलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा राज्यातील जिल्हाधिकार्‍यांची आणि विभागीय आयुक्तांची आढावा बैठक घेतली. यात धडक सिंचन विहिरींचाही आढावा घेण्यात आला. या वेळी रद्द केलेल्या विहिरींचे वास्तव पुढे आले. यात मंजूर केलेल्या सिंचन विहिरी रद्द करतानाही उर्वरित महाराष्ट्राला भाजप-शिवसेना सरकारने झुकते माप देऊन विदर्भातील शेतकर्‍यांवर आन्याय चालवला आसल्याचेच चित्र या आकडेवारीहून स्पष्ट झाले आहे, तर राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या विभागात एकूण मंजूर विहिरींपैकी रद्द करण्यात आलेल्या विहिरींची टक्केवारी ते १० टक्के एवढी आसताना विदर्भात मात्र, तब्बल २५ टक्के विहिरी रद्द करण्यात आल्या, तर कोकणातील २२ टक्के विहिरी रद्द केल्या. विहिरी रद्द करताना राज्य सरकारने समतोल साधला नसून, विदर्भातील जनतेला दुजाभावाची वागणूक दिली आसल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

शेतीला मुबलक पाणी देण्याचे प्रयत्न
विभागातील पाचही जिल्ह्यांत होणार्‍या शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी शेतीला मुबलक पाणी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न राज्य सरकार करत आहे. शेतकर्‍यांच्या शेतात धडक सिंचन विहिरींच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून देण्याची ही योजना आहे. यामुळे आल्पभूधारक शेतकर्‍यांना पीक घेण्यासाठी पाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. परिणामी, शेतीच्या उत्पन्नात वाढ होऊन शेतकर्‍यांना आधिकाआधिक आर्थिक फायदा होण्यास मदत होईल.
बातम्या आणखी आहेत...