आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नव्या आपत्ती निकषानुसार विभागात शेती सर्वेक्षण सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - नैसर्गिक आपत्तीच्या नव्या निकषानुसार विभागातील पाचही जिल्ह्यात पीक नुकसानीचे सर्वेक्षण सुरू केले अाहे. यानुसार बाधित शेतकऱ्यांसाठी यापूर्वी असलेली ५० टक्के नुकसानाची अट आता शिथिल केली असून, नवीन निकषानुसार ३३ टक्के नुकसानग्रस्त शेतकरीसुद्धा मदतीकरिता पात्र ठरणार आहेत.

नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) आणि केंद्र आपत्ती प्रतिसाद निधीच्या (एनडीआरएफ) निकष आणि दरांमध्ये सुधारणा केली आहे. याकरिता राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन केंद्र सरकारच्या निकषानुसार एप्रिल २०१५ ला नवा अधिनियम प्रसूत केला. यानुसार नैसर्गिक आपत्तीमधील बाधित शेतकऱ्यांसाठी ५० टक्के नुकसानाची अट आता शिथिल केली आहे. एप्रिल २०१५ मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पीक आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विभागीय आयुक्तालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विभागातील वाशीम जिल्ह्याचे सर्वेक्षण सध्या पूर्ण झाले असून, उर्वरित चार जिल्ह्यांचे सर्वेक्षण अद्याप बाकी आहे. नव्या निकषानुसार वाशीम जिल्ह्यातील२३९ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले आहे. यामुळे ६४६ शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले.

काय आहेत नवे बदल
केंद्र सरकारच्या १४ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार नैसर्गिक आपत्तीमधील बाधितांना २०१५ ते २०२० या कालावधीकरिता मदत निधी देण्याकरिता ही सुधारणा केली आहे. नैसर्गिक आपत्तीसाठी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता नुकसानीकरिता ५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास नुकसानभरपाई देण्यात येत होती. नवीन निकषानुसार पीक नुकसानीची ५० टक्क्यांची अट ३३ टक्के एवढी शिथिल केली आहे. तसेच कोरडवाहू शेतीकरिता हजार ५०० रुपयांवरून हजार ८०० तर बागायती शेतीकरिता हजारांवरून १३ हजार ५०० आणि फळबागाकरिता १२ हजार रुपयांवरून १८ हजार रुपये एवढी वाढ केली आहे. ही मदत किमान हेक्टरपर्यंत देण्यात येणार आहे.

नैसर्गिक आपत्तीमध्ये या घटनांचा समावेश
चक्रीवादळ, भूकंप, आग, पूर, त्सुनामी, गारपीट, दरड कोसळणे, बर्फखंड कोसळणे, टोळधाड, दुष्काळ, ढगफुटी, कडाक्याची थंडी, अवेळी पाऊस, आकस्मिक आग, समुद्राची उधाण, वीज कोसळणे आदींचा समावेश आहे.
बातम्या आणखी आहेत...