आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अचलपूर तालुका ठरला "ई-फेरफार'मध्ये अव्वल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतवाडा- ऑनलाइन ई-फेरफार करण्यामध्ये अमरावती जिल्ह्यात अचलपूर तालुका अव्वल ठरला आहे. शेतजमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहाराची तलाठ्याच्या दप्तरी ऑनलाइन नोंद करण्यात आली आहे. अचलपूरच्या दुय्यम िनबंधक कार्यालयामध्ये २० फेब्रुवारी ते २० मे दरम्यान ४५ शेतजमिनींचे व्यवहार ऑनलाइन करण्यात आलेत, तर तहसील कार्यालयात रोज दीडशे उत्पन्नाचे दाखले, ३०० प्रतिज्ञापत्रे ऑनलाइन पद्धतीने दिली जातात. तसेच वाटणीपत्र जमीन खरेदी-विक्रीचे ६० ते ६५ व्यवहार ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले आहेत.
अचलपूर येथील ई-महा सेवा केंद्रांतर्गत सर्वप्रथम कनिष्ठ लिपिक, अव्वल कारकून यांच्या ऑनलाइन डिजिटल पाहणीनंतर नायब तहसीलदार या दस्तऐवजांना पूर्ण करत आहेत. या ऑनलाइन दस्तऐवज नोंदणीमुळे ७/१२ वरच्या नोंदी फेरफार ही ऑनलाइन झाल्याने कामाला लागणारा विलंब, भ्रष्टाचार आणि हेलपाटे मारावे लागत नसल्यामुळे आता महसूल विभागाची प्रतिमा नागरिकांत सकारात्मक झाली आहे. या योजनेंतर्गत सर्वप्रथम खरेदी-व्यवहारासाठी नोंदणी विभागाकडे दस्त नोंदणीकरिता जातात.

तत्काळ फेरफारची नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जाते. त्यानंतर खरेदी झाल्यानंतर हा ऑनलाइन फेरफार ई-म्युटेशन समिती संबंधित तलाठ्याकडे जाते. ऑनलाइन नमुना आणि १२ ची नोटीस नोंद घेतली जाते. मंडळ अधिकारी त्याला मान्यता देतात. नंतर ऑनलाइन सात-बारा दिला जातो. यामुळे तलाठी कार्यालयाचे कामकाज ह्यपेपरलेसह्ण झाले असून, नागरिकांना या खरेदी-विक्री व्यवहाराकरिता ऑनलाइन चालन (रक्कम) देण्याची सुविधा असून, आता खरेदीकरिता लागणारे स्टॅम्प घेण्याची गरज नाही. ती रक्कम आॅनलाइन भरली जाते.
विदर्भातील ऑनलाइन ई-फेरफार करण्यामध्ये अचलपूर तालुक्याचा उल्लेख होतो. अचलपूर येथील सहायक निबंधक अर्जुन बडघे, तहसीदार मनोज लोणारकर, नायब तहसीलदार धीरज स्थूल, मंडळ अधिकारी व्यवहारे, तलाठी आर. बी. गावंडे यांचा या ई-म्युटेशन सेलच्या तालुकास्तरीय समितीत समावेश आहे.
तलाठ्याची डिजिटल स्वाक्षरी
महसूल यंत्रणेत तलाठ्याची महत्त्वाची भूमिका आहे. ऑनलाइन नोंदणी, फेरफार योजनांबाबत तलाठ्यांना संगणकीय प्रशिक्षण देण्यात आले असून, त्यांना लॅपटॉपही दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वाक्षरीलाही आता अधिक महत्त्व आले असून, तो डिजिटल स्वाक्षरीने शेतकऱ्यांच्या दस्तऐवजाची नोंद आपल्या दप्तरी घेत आहे.
१३ दिवसांत घ्यावी लागते नोंद
शेत जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहाराची ऑनलाइन नोंद झाल्यानंतर तलाठी दप्तरी त्याची नोंद केली जाते. तलाठ्याला १३ दिवसांत त्याची नोंद घ्यावी लागते, नोंद घेतल्यास त्याची कारणे त्याला द्यावी लागतात.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, नोंदणी व्यवहार झाला सोयीचा...