आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितीन देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - नवाथे चौकातील हॉटेल रंगोली पर्लचे मालक नितीन राघवेंद्र देशमुख यांच्याविरुद्ध राजापेठ पोलिसांनी मादकद्रव्य विक्री व अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
रविवारी रात्री रंगोली पर्ल येथे एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बजरंग दल व राजापेठ पोलिसांनी छापा टाकला असता काही युवक मद्यप्राशन केलेले आढळले, तर काही युवती नृत्य करत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. अशा प्रकारच्या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी पोलिस परवानगी आवश्यक असते; तसेच इटिंग हाउसची परवानगी असलेल्या ठिकाणी कार्यक्रमाची तिकीट देऊन प्रवेश देण्यासाठीसुद्धा पोलिस परवानगी आवश्यक आहे. नृत्यास बंदी असतानाही या हॉटेलमध्ये नृत्य झाले. नियमांच्या उल्लंघनामुळे राजापेठ पोलिसांनी हॉटेलमालक नितीन देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार शिवा भगत यांनी ही माहिती दिली आहे.

तीन वर्षे शिक्षा; पाच लाखांच्या दंडाची तरतूद
डान्सबार बंदीनंतर राज्य शासनाने जून, 2014 मध्ये कठोर निर्णय घेतला. त्यानुसार कोणत्याही हॉटेलमध्ये कोणताही डान्स (नृत्य) करता येत नाही. तसेच खाद्यपदार्थ विक्री (इटिंग हाउस) करणार्‍या हॉटेलमध्ये तिकीट घेऊन कार्यक्रम प्रवेशासाठी पोलिस परवानगी आवश्यक आहे. नियमांच्या उल्लंघनामुळे पोलिसांनी कलम 33 (अ), 33 (एक्स अ), (बी 2) अन्वये गुन्हा दाखल केला आणि न्यायालयात दोष सिद्ध झाल्यास तीन वर्षे शिक्षा, पाच लाख दंडाची तरतूद आहे, असे आयुक्तालयाचे विधी सल्लागार अँड. अनिल विश्वकर्मा यांनी सांगितले.