आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरापूरकरांचा ‘अर्धसत्य’ मनामनांत रुजलेला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- ‘कायसिनेमा होता राव... जबरदस्त...! सदाशिव अमरापूरकर यांची खलनायकी, ओम पुरी यांचा पोलिसी बाणा... अमरीश पुरी यांचा अभिनय...एकदम सॉलिड केमेस्ट्री होती बॉस...!’
पंचवीस वर्षे जुन्या ‘अर्धसत्य’ चित्रपटाबद्दल अशी संवादफेक होण्यामागचे कारणही तसेच आहे. ते म्हणजे, सदािशव अमरापूरकर यांची अवेळी झालेली एक्झिट. जयस्तंभ चौकात उभी असलेली रतन खत्री यांची प्रिया टॉकिज त्या काळी श्री टॉकीज नावाने ओळखली जायची. आजपासून २३ वर्षांपूर्वीचे हे तिचे नामाभिधान. या थिएटरमध्येच हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. दणकेबाज कथानक असल्याने बराच काळ तो सुरू राहिला. अमरापूरकर यांचा बहुदा तो पहिलाच चित्रपट होता. त्यामुळे अमरावतीकर रसिक प्रेक्षकांनीही त्याला भरभरून साथ दिली. अनेकांनी तो वारंवार बघितला. अमरापूरकर यांची खलनायकी आणि ओम पुरी यांचा पोलिसी खाक्या, हा त्या चित्रपटाचा प्राण. त्यामुळे तो अजूनही अनेकांच्या स्मरणात आहे. अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या स्थािनक शाखेचे अध्यक्ष अॅड. चंद्रकांत डोरले, ज्येष्ठ विधीज्ञ मराठी चित्रपटातील अनेक बड्या कलाकारांशी मैत्री असलेले श्रीकांत खोरगडे, अॅड. प्रशांत भेलांडे यांनीही सदाशिव अमरापूरकर यांच्याबद्दलच्या जुन्या आठवणी ताज्या केल्या.
अमरावतीत येण्याचे दिले होते आश्वासन
त्यांचीआठवण ताजी करताना अखिल मराठी नाट्य परिषदेच्या अमरावती शाखेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ मोरे म्हणतात, नाट्य संमेलनाच्या निमित्ताने आम्ही नगर जिल्ह्यात गेलो होतो. अमरापूरकर तेव्हा आयोजन समितीतील सदस्य होते. संमेलनात कोणताही बडेजाव नव्हता. मात्र, संपूर्ण व्यवस्था चोख केली गेली होती. अमरावतीत आयोिजत केल्या जाणाऱ्या नाट्य शिबिराच्या निमित्ताने येईल, असे ते म्हणाले होते.