आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा स्पर्धा अनुदानात भरमसाट वाढ, नव्या मोसमापासून मिळणार वाढीव निधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - राज्यसरकारने नव्या क्रीडा मोसमापासून शालेय क्रीडा स्पर्धांच्या अनुदानात भरमसाट वाढ केल्यामुळे क्रीडा क्षेत्रात आनंदी आनंद आहे.

क्रीडा युवक संचालनालयातर्फे मान्यताप्राप्त खेळाच्या जिल्‍हास्तरीय स्पर्धेच्या आयोजनासाठी यापुढेही १५ हजार रुपये अनुदान मिळेल. याआधी ही रक्कम केवळ अडीच हजार रुपये इतकी अत्यल्प होती. आता यात वाढ झाल्यामुळे कोणत्याही जिल्‍हास्तरीय स्पर्धेचे आयोजन व्यवस्थित करता येईल, अशी माहिती जिल्‍हा क्रीडा अधिकाऱ्यांनी दिली .

अनुदानाची अशी असेल विभागणी
तालुकास्तरीयशालेय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रतिखेळ दहा हजार, जिल्‍हास्तरीय स्पर्धा आयोजनासाठी प्रती खेळ १५ हजार (विशेष मेहेरबानी असलेले सहा खेळ वगळून), कपभागीय स्पर्धेसाठी १५ हजार, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी विशेष नियमानुसार आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रतिखेळ दहा लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे.
क्रिकेट, फुटबॉलवर विशेष मेहरबानी
शासनाचीकाही खेळांवर विशेष मेहरबानी असल्याचे दिसते. या खेळाच्या जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्यासाठी ३० हजार रुपये अनुदानाची तरतूद केलीय. या खेळांमध्ये क्रिकेट, फुटबॉल, अ‍ॅथलेटिक्स (मैदानी स्पर्धा), जलतरण, कबड्डी आणि खो-खो या सहा खेळांचा समावेश आहे. शिवाय इतर सर्व खेळांच्या आयोजनासाठी १५ हजार रुपये अनुदान मिळेल.
आता स्पर्धेचे व्यवस्थित आयोजन शक्य होईल

-शासनानेजिल्‍हास्तरीय स्पर्धेच्या अनुदानात वाढ केल्यामुळे यापुढे कोणत्याही स्पर्धेचे व्यवस्थित आयोजन शक्य होईल. महागाई वाढल्यामुळे अडीच हजार इतक्या कमी अनुदानात स्पर्धा आयोजित करताना फारच काटकसरीने खर्च करावा लागायचा. आता मात्र सर्व कामे व्यवस्थित करता येतील. अविनाशपुंड, जिल्‍हाक्रीडा अधिकारी.