आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाचवीच्या प्रवेशाची झुंबड 10 जूनपासून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- चौथीची परीक्षा उत्तीर्ण करून पाचवीत दाखल होणार्‍या विद्यार्थ्यांचा प्रवेश यावर्षीही सोडतीद्वारेच निश्चित होणार आहे. त्यासाठी 10 जूनपासून विद्यार्थी-पालकांची लगबग सुरू होणार आहे.
शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वेळापत्रकानुसार, 10 ते 12 जून या तीन दिवसांत प्रवेश अर्जांची देवाणघेवाण राहील. सकाळी 11 ते दुपारी दोन या वेळेत सर्व शाळांमधून प्रवेश अर्जांचे वितरण केले जाईल. शिवाय त्याच कालावधीत ते अर्ज स्वीकारलेही जातील. चौथी उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका व शाळा सोडल्याचा दाखला या दोन प्रमाणपत्रांच्या आधारे प्रवेश अर्ज मिळवता येईल. शिवाय त्याच कागदपत्रांच्या फोटो कॉपी लावून त्याच ठिकाणी तो अर्ज भरून देता येईल. अशाप्रकारे प्राप्त सर्व अर्जांची यादी 16 जून रोजी घोषित केली जाईल. 17 जूनला सकाळी 11 वाजता सर्व शाळांमध्ये प्रवेशाची सोडत (ड्रॉ) काढली जाईल.

ही प्रक्रिया आटोपल्यानंतर लगेच प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रिया सुरू केली जाणार आहे. सोडतीमध्ये भाग्यशाली ठरणार्‍या उमेदवारांना 17 ते 19 जून दरम्यान त्यांचे-त्यांचे प्रवेश निश्चित करावे लागणार आहेत. यानंतरही काही शाळांमध्ये जागा शिल्लक राहिल्यास 21 जून रोजी दुसरी सोडत काढण्यात येईल. त्याच वेळी प्रतीक्षा यादीही तयार केली जाणार आहे.