आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Adv. Yashomati Thakur Support To RPI At Amaravati, Maharashtra Election 2014

अॅड. यशोमती ठाकूर यांना रिपाइं आघाडीचा पाठिंबा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- तिवसा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार अॅड. यशोमती ठाकूर यांनी मतदारसंघात केलेली विकासकामे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्म शताब्दी महोत्सवानिमित्त मोझरी विकास आराखडा तयार करून १५७ कोटींची कामे, शेती सिंचनासाठी ४०० कोटी रुपये मिळवून दिल्याने रिपब्लिकन आघाडीने त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
अॅड. ठाकूर यांनी संत गाडगेबाबा निर्वाणभूमी वलगाव विकास आराखडा तयार केला. विदर्भ वैधानिक विकास महामंडळाकडून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. तिवसा येथील मागासवर्गीय मुलांसाठी वसतिगृह निर्माण करून दिले. त्याच प्रमाणे दलित वस्ती सुधारणा, रस्ते विकास, गारपीटग्रस्तांना नुकसान भरपाई, तिवसा तालुका क्रीडा संकुलाची निर्मिती करून खेळाडूंना चालना दिली. यशोमती ठाकूर यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात मतदार संघात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाल्याने जनतेच्या बहुतांश समस्या सुटल्या आहेत. त्यांच्या विकासकार्यांची दखल घेऊन रिपब्लिकन आघाडीने त्यांना जाहीर पाठिंबा दिल्याचे आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. दीपक गवई विदर्भ अध्यक्ष सुनील उगले यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळवले आहे.

अॅड. ठाकूर यांना पाठिंबा देऊन रिपब्लिकन आघाडीचे कार्यकर्ते प्रा. दिनेश पोहेकर, दशरथ उगले, प्रा. सुनील इंगळे, नीलेश पारवेकर, प्रा. सुनील हजारे, जितेंद्र धवणे, प्रा.नीलेश खरडे, प्रवीण मोखळे, प्रा. स्नेहदीप स्वर्गे, प्रा. ईश्वर डोंगरे, प्रा.मेश्राम, प्रा. गवई, प्रा. शेख शारिक, प्रा. रंजिता पाटील,प्रा. भारती वानखडे, स्नेहलता गवई, पपिता उगले, डॉ..जगदीश नगराळे, बेबी गरुड, बंडू गवई, किशोर नितनवरे, प्रवीण जोशी हे यशोमती ठाकूर यांच्या प्रचार कार्यात सहभागी झाले आहेत.