आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • After Delivery Within 15 Hours She Reached At Examination Center

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रसूतीनंतर १५ तासांतच ती पोहोचली परीक्षा केंद्रावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: यवतमाळ येथील राज्य लोकसेवा आयोगाच्या केंद्रावर परिक्षेसाठी भाऊ नीलेशसह आलेल्या कल्याणी तीजारे.
यवतमाळ - इच्छाशक्तीआणि ध्येय गाठण्यासाठी जिद्द असली, तर मनुष्य परिस्थितीवर मात करू शकतो. हे रविवारी यवतमाळ येथे घडलेल्या घटनेने सिद्ध करून दाखवले आहे. शनिवारी सायंकाळी वाजता बाळाला जन्म दिलेल्या मातेने तिच्यातील जिद्दीने प्रसूतीच्या दुस-याच दिवशी सकाळी ११ वाजता राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षेसाठी केंद्र गाठले.

कल्याणी जयप्रकाश तिजारे असे त्या महिलेचे नाव आहे. कल्याणी या नेर येथील नगरपालिकेच्या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. ही नोकरी करताना त्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत. यातच फेब्रुवारीला राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने विक्री कर निरीक्षक पदाच्या परीक्षेसाठी त्यांनी अर्ज दाखल केला होता. त्याची तयारीही सुरू केली होती. मात्र, त्या गर्भवती असल्याने डॉक्टरांनी त्या परीक्षेच्या कालावधीतीलच तारीख प्रसूतीसाठी दिली होती. त्यामुळे त्या दुहेरी पेचात सापडल्या होत्या. त्यातच त्यांना शनिवारी प्रसूतीसाठी डॉ. मोसमी वराडे यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी शनिवारी सायंकाळी वाजता त्यांनी बाळाला जन्म दिला. त्यानंतर रात्री रुग्णालयात आराम केला. मात्र, रविवारच्या परीक्षेचा विचार त्यांच्या डोक्यात सुरूच होता. मुलगा झाल्याचा आनंद तर होताच. मात्र, परीक्षा देता येणार नाही याचे शल्यही त्यांना जाणवत होते. त्यामुळे राहवून त्यांनी प्रथम पती जयप्रकाश तिजारे यांना परीक्षा देण्यासाठी विचारणा केली. त्या वेळी प्रसूती होऊन बारा तासच लोटलेले होते. मात्र, पत्नीची ही जिद्द पाहून त्यांनीही तिला साथ दिली. त्यानंतर डॉक्टरांची परवानगी घेऊन कल्याणी यांनी ११ वाजताअभ्यंकर कन्या शाळेत असलेले परीक्षा केंद्र गाठले. त्या वेळी तिथे उपस्थित पोलिस कर्मचारी, केंद्रावरील अधिकारी यांनीही कल्याणी यांचे स्वागत केले.परीक्षा आटोपून कल्याणी पुन्हा रुग्णालयात वाट पाहत असलेल्या त्यांच्या चिमुकल्याजवळ परतल्या. त्यांच्या या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कल्याणीची जिद्द वाखाणण्याजोगी
कल्याणीहीची प्रसुती शनिवारी झाली होती. त्यानंतर तीची आणि तीच्या बाळाची दोघांची प्रकृती सुदृढ होती. रविवारी तीने परिक्षा असल्याचे सांगून ती परिक्षा देण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले. त्यावेळी तीची जीद्द आणि इच्छाशक्ती पाहून आणि तीची प्रकृती सुदृढ असल्याने आणि एका तासाची परीक्षा असल्याने तीला परवानगी दिली. डॉ.मोसमी व-हाडे, स्त्रीरोगतज्ज्ञ
यवतमाळ येथील राज्य लोकसेवा आयोगाच्या केंद्रावर परिक्षेसाठी भाऊ नीलेशसह आलेल्या कल्याणी तीजारे.
परीक्षेनंतर गाठले असते रुग्णालय
डॉक्टरांनीयापूर्वी फेब्रुवारीची तारीख प्रसूतीसाठी सांगितली होती. त्यामुळे प्रथम परीक्षा देण्याचा आणि त्यानंतर प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल होण्याचा विचार केला होता. मात्र, तसे झाले नाही. अभ्यास करताना घेतलेली मेहनत वाया जाऊ नये यासाठी जिद्द करून परीक्षेचा पेपर दिला. कल्याणीतिजारे, महिला