आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सामान्यांशी पुन्हा नाळ जोडणार - अशोक चव्हाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - वर्षभरात सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या एकाही आश्वासनांची पूर्तता केली नाही. त्यामुळे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्याची भूमिका पक्षाच्या वतीने घेण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गुरुवारी (दि. २१) अमरावती येथे अायाेजित पत्रकार परिषदेत दिली.

तब्बल आठ वर्षांनंतर आयोजित पक्षाच्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीसाठी चव्हाण येथे आले होते. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, निवडणुकीमध्ये भाजप सहकारी पक्षाने खोऱ्याने आश्वासने दिली. सध्या या शासनाला वर्षपूर्ती झाली आहे. परंतु, अद्याप एकाही आश्वासनाची पूर्तता सरकारकडून होऊ शकली नाही. त्यामुळे या सरकारला दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देणे आवश्यक आहे. पक्षाचीही हीच भूमिका असल्यामुळे येत्या काही दिवसात सत्ताधाऱ्यांना प्रत्येक आश्वासनांची आठवण करून दिली जाईल. दुष्काळ, टंचाई शेतकऱ्यांच्या आत्महत्या या तीनही बाबी या वर्षी गंभीर आहेत. त्यामुळे शासनाने संपूर्ण कर्जमाफी करणे आवश्यक आहे. परंतु, सध्या शासन या तीनही बाबींबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांची एकूण स्थिती पाहता या खरीप हंगामात शेतकऱ्यांना विनामूल्य बियाणे, खते द्यावी. कर्जमाफी करून शेतकऱ्यांना नव्याने कर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे. राज्यात सध्या गुन्हेगारीचा आलेख वाढता आहे. परंतु, राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. मुस्लिम आरक्षणाबाबत शासनाने घेतलेली भूमिका चुकीची आहे. देशात लोकशाही असल्यामुळे प्रत्येकाला समान हक्क मिळाले पाहिजे. पत्रकार परिषदेला सुधाकर गणगणे, आमदार प्रा. वीरेंद्र जगताप, अॅड. यशोमती ठाकूर, बबलू देशमुख, केवलराम काळे, नरेशचंद्र ठाकरे, संजय खोडके, आदी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...