आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांसाठी कृषी विद्यापीठे ठरले कुचकामी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुसद - महाराष्ट्रातचार कृषी विद्यापीठे आहेत. मात्र, या विद्यापीठांकडून शेतकऱ्यांना हवे असलेले संशाेधन मिळत नाही. आधुनिक शेती तंत्रज्ञान संशाेधनामध्ये कृषी विद्यापीठे कुचकामी ठरले आहेत, अशी टीका राज्याचे माजी मंत्री तथा आमदार मनाहरराव नाईक यांनी येथे अाज केली.
लोकनेते बाबासाहेब नाईक यांच्या स्मृती दिनानिमित्त वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान सभागृहात शुक्रवार, २६ जून राेजी आयोजित ‘वसंत शेतकरी प्रबोधनकार सन्मान’ परिषेत ते अध्यक्षस्थानावरून बोेलत होते. व्यासपीठावर राज्य कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष डाॅ. एन. पी. हिराणी, माजी आमदार विजयराव पाटील चोंढीकर, के. डी. जाधव, आर. डी. राठोड, विदर्भ शेतकारी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणदादा जाधव, आत्मा प्रकल्पाचे उपसंचालक काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार मनाेहरराव नाईक म्हणाले, शेतकारी आणि शेती यांची आजची निकड पाहून कृषी विद्यापीठांनी संशाेधन केले पाहिजे. या दृष्टीने विद्यापीठांची कामगिरी दिसून येत नाही. शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती कशी करावी? याचे प्रत्यक्ष ज्ञान दिले जात नाही. कृषी विद्यापीठांकडे हजारो हेक्टर जमीन पडून आहे. त्यावर बीजोत्पादनाचे कार्यक्रम राबवून अनियमित पावसाळ्यात तग धरणारे बियाणे निर्माण केले पाहिजे. मात्र तसे होत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. तूर, सोयाबीन असो वा भुईमूग, कापूस असाे, या पिकात शेंगदाणा, बोंडातील बियांची संख्या, तेलाचे प्रमाण कसे वाढेल या बद्दल संशाेधन हवे. यासाठी कृषी विद्यापीठांनी समोर यायला हवे, असेही ते म्हणाले. या वेळी आत्माचे उपसंचालक काळे यांनी शेतकऱ्यांना शेती तंत्रज्ञानाची माहिती दिली. डाॅ. हिराणी विजय पाटील यांनी शेती विषयक मार्गदर्शन केले. या वेळी कर्तबगार शेतकऱ्यांना गौरवण्यात आले.
यांचा कार्यक्रमात राहिला सहभाग
प्रारंभीराजर्शी शाहू महाराज, वसंतराव नाईक बाबासाहेब नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक बाबासाहेब नाईक कृषी विज्ञान केंद्र हुडीचे अध्यक्ष आयोजक विजय राठोड यांनी केले. कार्यक्रमाला बाबाराव जाधव शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक शिवाजी तोरकड, सुरेश देशमुख, मोहन देशमुख, युवराज चव्हाण, अनिल आडे, अशाेक धाडवे, डाॅ. मोतीराम चव्हाण, समाधान राठोड शेतकारी उपस्थित होते. सूत्रसंचलन युवराज चव्हाण तर आभार डाॅ. बोके यांनी मानले.
शेतीचे ज्ञान नसलेले सत्तेत
शेतकऱ्यांच्याप्रश्नांची जाण नसलेले नेते आज सत्तेत आहेत. शेतकऱ्यांना तारावयाचे असेल तर संपूर्ण कर्ज माफीचा निर्णय आजच्या घडीला घेणे गरजेचे आहे, असेही अा. नाईक म्हणाले.
नाराजी व्यक्त
बातम्या आणखी आहेत...