आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Agriculture Departmnet Meeting For Resolve Farmers Problem

आढावा बैठक : साडेचार तास खरीप ‘पेरणी’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शेतकरी शेतीच्या झालेल्या भीषण अवस्थेमुळे जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीच्या इतिहासात प्रथमच साडेचार तास संभाव्य अडचणींवर गांभीर्याने चर्चा करण्यात आली.

राजकीय हेवेदावे, आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण बाजूला सारून भाजपचे डॉ. अनिल बोंडे, काँग्रेसचे प्रा. वीरेंद्र जगताप, अ‍ॅड. यशोमती ठाकूर या तीन आमदारांनी पोटतिडकीने शेतकर्‍यांच्या समस्यांबाबत बाजू मांडली. ग्रामीण भागातील चार प्रमुख आमदार बैठकीला गैरहजर राहिल्यामुळे अचलपूर, दर्यापूर, मेळघाट बडनेरा मतदारसंघांतील शेतकरी पोरके झाल्याचे चित्र या बैठकीत दिसून आले.

खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी खते, बियाणे, शेतकर्‍यांच्या अडचणी मांडून त्या सोडवण्यासाठी दरवर्षी जिल्हा प्रशासनाची खरीप हंगामपूर्व आढावा बैठक घेण्यात येते. या बैठकीला शेतीशी संबंधित सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित असतात. आतापर्यंत ही बैठक केवळ शासकीय नियोजनाचा अहवाल थातूरमातूर उपाययोजना करून दीड-दोन तासांत गुंडाळण्यात येत होती; परंतु शुक्रवारी प्रथमच ही बैठक अंदाजे साडेचार तास चालली. बैठकीत कृषीशी संबंधित अडचणींवर चर्चा करण्यात आली. आमदार डॉ. अनिल बोंडे, प्रा. वीरेंद्र जगताप अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी आपापल्या मतदारसंघांतील जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या समस्या मांडल्या. उर्वरितपान

शंभर टक्के क्षेत्रावर पेरणीचे नियोजन
जिल्ह्यातयावर्षी खरीप हंगामाच्या सरासरी क्षेत्रात वाढ करण्यात आली असून, सरासरी क्षेत्र सात लाख १४ हजार ९५० हेक्टर ठरवण्यात आले. मागील वर्षीच्या लाख ९६ हजार ५०० हेक्टर कपाशी पेरणीच्या क्षेत्रात यावर्षी साडेतीन हजार हेक्टरची वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. सोयाबीन, मूग, ज्वारीच्या क्षेत्रातही वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे.

वीजपंप रोहित्राचा मुद्दाही तापला
आमदारजगताप यांनी वीजपंपाच्या जोडण्या रोहित्राचा प्रश्न उपस्थित केला. यामुळे शेतकर्‍यांना सिंचन करताना अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. यावर वीज कंपनीचे अधीक्षक अभियंता दिलीप घुगल यांनी अडचणी समस्या सांिगतल्या. यावर पालकमंत्र्यांनी उपाययोजना करण्याचे सांगितले. घुगल यांनी या अडचणींवर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

मोर्शीच्या तालुका अधिकार्‍याला हाकला
मोर्शीयेथील तालुका कृषी अधिकार्‍याच्या अनेक तक्रारी आहेत. अधिकारी शासकीय आदेश पाळत नसून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी आमदार डॉ. बोंडे यांनी केली. अ‍ॅड. ठाकूर यांनीही या अधिकार्‍याबाबत तक्रारी केल्या. कृषी अधिकार्‍यांनीही संबंधित अधिकार्‍याला सक्तीच्या रजेवर पाठवून कारवाई करण्यात आल्याचे सांगितले. यावर आमदारद्वय चांगलेच चिडले. कामचुकार अधिकारी असतील, तर शेतकर्‍यांची कामे कशी होतील, असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे या अधिकार्‍याला त्वरित निलंबित करण्यात यावे अशी मागणी आमदारांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय मुळे यांना केली. यावर मुळे यांनी निलंबनाची कारवाई आपल्या अखत्यारित येत नसल्याचे सांगितले. यावरून प्रकरण तापल्याने जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त यांनी या अधिकार्‍यावर कारवाईचे आदेश दिले.

आमदार द्वय कुलगुरूंवर उखडले
जिल्ह्याच्या खरीप आढावापूर्व बैठकीला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी उपस्थित होते. शेतकरी प्रशिक्षणाबाबत बोलताना डॉ. दाणी यांनी विद्यापीठाने देश-विदेशातील शेतकरी बोलावल्याचे सांगितले. यावर प्रा. जगताप यांनी जिल्ह्यातील किती शेतकर्‍यांना विद्यापीठाने मार्गदर्शन केले; तूर, सोयाबीन, कापूस वेचणी कापणीसाठी आवश्यक यंत्रांसाठी काय संशोधन केले, असे विचारले. तर डॉ. बोंडे यांनी विद्यापीठ कृषी विभागात ताळमेळ नसल्याचे म्हटले. दोन्ही आमदारद्वयांनी कुलगुरूंना चांगलेच धारेवर धरल्याने बैठकीचे वातावरण काही काळ गंभीर झाले. कुलगुरू दाणी यांनी आमदारांना संशोधनाबाबत अधिक माहितीसाठी; तसेच किती शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले हे पाहण्यासाठी विद्यापीठात येण्याची विनंती केली. आमदारांनी अनेक प्रश्न उपस्थित केल्याने कुलगुरू गंभीर झाल्याचे जाणवत होते. पालकमंत्र्यांनी मध्यस्थी करून वेळ निभावून नेली.