आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतीच्या वादातून केली शेतकऱ्याने आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती -येथील शिवाजी नगरातील रहिवाशी शेतकऱ्यानी राहत्या घरी छताच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी साडेचारच्या दरम्यान घडली. शिवराम झिंगर आगासे (६२) असे त्या शेतकऱ्याचे नाव असून शेतीच्या वादातून त्यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, आगासे यांचे चार एकर शेत होते. शेतामध्ये २८ बाय २८ जागेत मंदिर बांधले होते. अमरावती-पुलगाव बायपास मार्गावर असलेले हे शेत काही वर्षांपूर्वी आगासे यांनी अनिल मेश्राम यांना विकले होते. त्यावेळी २८ बाय २८ ची जागा सोडून खरेदी खत करण्यात आले होते. जागेबाबत ५० रुपयांच्या स्टँप पेपरवर करारनामा लिहून घेतला होता. मात्र काही दिवसांपूर्वी मेश्राम यांनी शेतातील मंदिर पाडून संपूर्ण शेताला कुंपण घातले. याबाबत आगासे यांना माहीत होताच त्यांनी मेश्राम यांना जाब विचारला असता, मेश्राम यांनी शिविगाळ करून आगासे यांना मारहाण केली. हा अपमान आगासे यांच्या जिव्हारी लागला. घरी कुणी नसल्याचे पाहून त्यांनी बुधवारी वायरने गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी मुलगा शेतातून परत आल्यानंतर घटना उघडकीस आली. घटनेची माहिती पोलिस ठाण्यात देण्यात आली.
ठाणेदार रिता उईके यांनी घटनेचा पंचनामा केला असता, मृत आगसे यांच्या खिशात चिठ्ठी मिळाली. गुरुवारी (दि. २५) आगासे यांच्या नातेवाईकांनी नागरिकांनी पोलिस ठाण्यात जाऊन अनिल मेश्राम याला अटक करण्याची मागणी केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. चौकशी करून आरोपीवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन ठाणेदार उईके यांच्याकडून मिळाल्यावर तणाव निवळला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. मृत आगासे यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली मोठा आप्त परिवार आहे.

शिवराम आगाशे