आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी अवतरणार अंबानगरीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जगप्रसिद्धअजिंठा लेणी यंदा अमरावतीच्या धरतीवर अवतरणार आहे. बुधवाऱ्यातील आझाद हिंद गणेशोत्सव मंडळ यंदा या लेणी मालिकेतील २६ व्या क्रमांकाची लेणी गणेशोत्सवात साकारत आहे. इतकेच नव्हे, तर मातीपासून तयार करण्यात आलेल्या सात फूट मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार असल्याची माहिती बुधवारी (दि. २७) पत्रपरिषदेत देण्यात आली.
सुमारे ८७ वर्षांपासून मंडळातर्फे विविध देखावे साकारण्यात आले. यंदा अजिंठा लेणी मालिकेतील एका लेणीची प्रतिकृती साकारण्यात येत आहे. यात गौतम बुद्ध यांच्या महापरिनिर्वाणाचे दृश्यही आहे. त्यासाठी त्यांची निद्रिस्त १६ फुटांची मूर्तीही साकारण्यात आली आहे. उत्सवात ठेवण्यासाठी सुमारे सात फुटांची मूर्ती गजानन सोनसळे हे साकारताहेत.
शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी हा देखावा गणेशोत्सवानंतरही काही दिवस खुला राहणार असल्याचे विलास इंगोले यांनी या वेळी सांगितले. पत्रकार परिषदेला राजाभाऊ मोरे, अनंत गुढे, विलास इंगोले, सोमेश्वर पुसदकर, प्रा. किशोर फुले, दिलीप दाभाडे, प्रकाश संघेकर, पप्पू कलोती उपस्थित होते.

ध्वनिप्रदूषण टाळणार
"दिव्यमराठी'ने गेल्या वर्षी गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषण मुक्तोत्सवासाठी अभियान राबवले होते. त्याचा उल्लेख करीत आझाद हिंद मंडळाच्या काही पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. देखाव्याला साजेसे संगीत मंद आवाजात असणार असल्याची मािहती सोमेश्वर पुसदकर यांनी िदली. शहरातील उर्वरित मंडळांनीही कर्कश आवाजात गाणे, डीजे वाजवणे टाळावे, असे आवाहनदेखील त्यांनी या वेळी केले.