आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय कर्मचाऱ्यांना यापुढे ऑनलाइन वेतन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शासकीयकर्मचाऱ्यांना यापुढे ‘ऑनलाइन’ वेतन मिळणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने सेवार्थ प्रणाली विकसित केली आहे. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनाही याच प्रणालीच्या माध्यमातून वेतन देण्यात येणार आहे. त्यासाठी मंगळवारी जानेवारीला प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या सभागृहात मंगळवारी अमरावती विभागातील सर्व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना सेवार्थ प्रणालीचे प्रशिक्षण देण्यात आले. ही प्रणाली विकसित करणाऱ्या यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी स्लाइड शो प्रेझेंटेशनच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना विस्तृत माहिती दिली. कोणत्या पद्धतीने कर्मचाऱ्यांची माहिती नमूद करायची, त्यातून वेतन कसे काढायचे, याबाबत माहिती देण्यात आली.

या प्रणालीतून कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्तिवेतन, भविष्य निर्वाह निधी, कर्ज प्रकरणे, अग्रीम वेतनाची व्यवस्थाही केली आहे. राज्य शासनाचे सर्वच विभाग सेवार्थच्या माध्यमातून ऑनलाइन वेतन प्रणालीत समाविष्ट करण्यात येत असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले. कोशागार विभागाशी संबंध असलेल्या प्रत्येक विभागाला कोणकोणती कामे सेवार्थ प्रणालीतून करावी लागतील, याची माहिती देण्यात आली.
मार्च अखेरपर्यंत होणार अंमलबजावणी
नव्यासेवार्थ प्रणालीच्या माध्यमातून वेतन, निवृत्ती वेतन आदी कामे करण्यास सुरूवात करण्यात येणार आहे. कागदी काम कमी करत ऑनलाइन प्रणालीनेच पारदर्शक पणे काम व्हावी असा राज्य सरकारचा उद्देश आहे. सुत्रांच्या मते मार्च अखेर पर्यंत सर्व कामे ऑनलाइन होतील.