आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amaracvati Constituency Maharashtra Assembly Election Polls

प्रचार पोहोचला शिगेला, कार्यकर्ते, उमेदवारांना नाही क्षणाचीही उसंत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. सोमवारी (१३ ऑक्टोबर) सायंकाळी सहा वाजता प्रचार तोफा थंडावतील. १५ तारखेला मतदान आहे. त्यामुळे प्रचारासाठी मोजकेच दिवस हाती असल्याने नेते, कार्यकर्ते, उमेदवारांना क्षणाचीही उसंत मिळत नसल्याचे चित्र आहे.
निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात राष्ट्रीय पक्षांनी सर्व सूत्रे कार्यकर्त्यांच्या हाती दिली आहेत. मतदारांना आकृष्ट करण्यासाठी आणि विश्वासात घेण्यासाठी कार्यकर्ता हेच माध्यम असल्याचे सर्वच पक्षांनी जाणले आहे. त्यामुळे सध्या कार्यकर्त्याच्या प्रचार कार्याला जोर आला आहे. मतदान केंद्र कक्षेतील मतदारांची मानसिकता स्थानिक कार्यकर्त्याला जास्त माहीत असते. त्याचबरोबर समस्यांनी त्रस्त मतदारांना कशा प्रकारे हाताळायला हवे, याची जाणीवही कार्यकर्त्याला असते. त्यामुळे आता कार्यकर्त्याला केंद्रस्थानी ठेवूनच प्रमुख पक्षांनी आपली प्रचाराची रणनीती निश्चित केली आहे. पंचरंगी लढतीमुळे ऐरवी संयुक्तपणे प्रचार करणारे कार्यकर्ते यंदा विभागले गेले आहेत. जाहीर प्रचारासाठी कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. कार्यकर्ते कशामुळे आकृष्ट होतील, त्यासाठी सर्व मार्ग अवलंबली जात आहे.

व्यापक पोलिस बंदोबस्त : पोलिस दलाचाही व्यापक बंदोबस्त जिल्ह्यात तैनात आहे. सुमारे चार हजारांवर पोलिस, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी सज्ज आहेत. प्रशासकीय यंत्रणेलादेखील प्रचार एकदाचा केव्हा संपतो, याची प्रतीक्षा आहे.