आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amaravati Gordian Minister Radhakrishna Vikhe Patil In City

अमरावतीचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज शहरात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- राज्याचे कृषी तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील शनिवारी अमरावतीच्या दौर्‍यावर आहेत. एक प्रशासकीय बैठक आणि पक्षीय पातळीवरील दोन कार्यक्रमांना ते उपस्थित राहतील.

नागपूरहून अमरावतीला ते रात्री 11 वाजता पोहोचतील. रविवारी सकाळी 10 ते साडेबारा या वेळेत त्याच ठिकाणी तालुका व शहर काँग्रेस अध्यक्षांची बैठक होईल. त्यानंतरचा त्यांचा पाऊणतास राखीव आहे. दरम्यान, पक्षांतर्गत रखडलेल्या इतर विषयांवर चर्चा केली जाऊ शकते. दु. 1.15 ते 2.30 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात भातकुली विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांच्या सोडवणुकीबाबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. दुपारी र्शी क्षेत्र वायगाव येथे आयोजित काँग्रेसच्या वचनपूर्ती मेळाव्याला उपस्थित राहतील. दौर्‍यात विखे पाटील विविध प्रश्नांवर नेमकी कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष आहे. पोलिस आयुक्तांच्या बदलीची मागणीही कार्यकर्ते त्यांच्याकडे करू शकतात.