आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amaravati Municipal Corporation Medical Godown Issue

औषधींच्या तपासणीला दोन वर्षांपासून ‘ब्रेक’; महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये पुरवल्या जात असलेल्या औषधींची मागील दोन वर्षांपासून तपासणीच करण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. भांडार विभागालादेखील अन्न व औषधी विभागाकडून औषधी तपासून घेण्याची गरज वाटली नाही. आमसभेत प्रा. प्रदीप दंदे यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर स्टँडर्डप्रमाणे औषधी पुरवली जात नसल्याची दुसरी धक्कादायक बाब समोर आली आहे.

आठ लाख लोकसंख्या असलेल्या शहरात बहुतांश क्षेत्रातील नागरिक महापालिकेच्या रुग्णालयांत उपचाराकरिता येतात. त्याचप्रमाणे आजूबाजूच्या ग्रामीण भागातील नागरिकदेखील महापालिकेच्या रुग्णालयांत उपचाराकरिता येत असल्याचे चित्र आहे. लाखो नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणाची जबाबदारी महापालिकेने भांडार विभागावर टाकली आहे. औषधीबाबत कोणताही तज्ज्ञ अधिकारी भांडार विभागाकडे नसतानाही औषधांची खरेदी त्या विभागाकडून केली जाते. आरोग्य विभागातील औषधी अधिकार्‍यावर अन्न व औषधी प्रशासनाकडे नमुने तपासणीसाठी पाठवण्याची जबाबदारी आहे. ताप, सर्दी, खोकला, मलेरिया, टायफॉइड आदी साथरोगांसाठी आवश्यक असलेल्या औषधींची महापालिका मोठय़ा प्रमाणात खरेदी करते. साथरोग औषधींमध्ये एखादी निकृष्ट औषधी निघाल्यास नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. ही खबरदारी घेणे महत्त्वपूर्ण आहे.