आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील दहा हजारांवर व्यावसायिकांना नोटीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती -स्थानिकसंस्था कराचे (एलबीटी) वार्षिक विवरण (अॅन्यूअलअल रिटर्न) विहित मुदतीत सादर केल्यास पाच हजार रुपयांचा दंड भरावा लागेल, अशी स्पष्ट ताकीद महापालिकेने दिली आहे.
एलबीटीसाठी नोंदणी केलेल्या सर्व दहा हजार ६७७ व्यावसायिकांना ही नोटीस धाडली आहे. या नोटीसनुसार, गेल्या आर्थिक वर्षाचे वार्षिक वविरण ३० जून २०१५ च्या आत सादर करावयाचे आहे. काही कारणांस्तव या कालवधीत विवरण सादर झाल्यास नोंदणीकृत दुकाने, प्रतिष्ठाने, बँका, शाळा, महावदि्यालये, संस्था, व्यापारी, उद्योजक, अडते, कंत्राटदार अशा सर्वांनाच दंडाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असे महापालिकेचे म्हणणे आहे.
दरम्यान, रिटर्न दाखल करण्यासाठी आवश्यक असलेली कोरी विवरणपत्रे महापालिकेने उपलब्ध करून दिली असून, हे सर्व दस्तऐवज पालिकेच्या एलबीटी विभागात उपलब्ध आहेत. शिवाय, भरून दिलेली विवरणपत्रे स्वीकारण्याची सोयही याच विभागात असून, कार्यालयीन वेळात ही सोय उपलब्ध राहणार असल्याचे कळवण्यात आले आहे. अमरावती शहरात दहा हजार ६७७ एलबीटीधारक आहेत.
या सर्वांनी नोंदणीही केली आहे. मात्र, बहुतेकांनी वेळोवेळी माहिती सादर केली नाही. त्यामुळे पालिकेच्या संबंधित विभागाने त्यांच्यावर कारवाई केली आहे. प्रसंगी दुकाने-प्रतिष्ठानांना टाळे ठोकण्याचीही भूमिका घेतली आहे. दरम्यान, या सर्वांना त्यांचे वार्षिक लेखे सादर करण्याची ही शेवटची संधी आहे. ३० जून २०१५ च्या आत आपापले विवरण सादर करावे, असे पालिकेने कळवले आहे.
३० जून ही शेवटची मुदत असेल
^एलबीटीचेअ‍ॅन्युअल रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३० जून आहे. या मुदतीतच सर्वांनी आपालले वविरण जमा करावे. विवरणाचे कोरे दस्तऐवज एलबीटी विभागात उपलब्ध करून देण्यात आले असून, भरलेले रिटर्न स्वीकारण्याची सोयही याच ठिकाणी करण्यात आली आहे. विनायकऔगड, उपायुक्त, एलबीटी.
काय आहे एलबीटी ?
एलबीटीहा स्थानिक संस्था कर म्हणून ओळखला जातो. पूर्वी जकातच्या रूपात तो वसूल केला जायचा. जकात हा आयात केलेल्या वस्तूंवर तत्काळ घेतला जायचा. याऊलट एलबीटी हा खरेदी केलेल्या वस्तूंचे लेखे सादर केल्यानंतर त्यानुसार येणारी आकारणी (रक्कम) ही बँक खात्यात जमा करावी लागते.
वर्षभरातील कारवाईवर एक नजर
{ कारवाई झालेली एकूण दुकाने - १९८
{ त्यापैकी टाळेबंद केलेली - ३१
{ दंडापोटी वसूल झालेली रक्कम - ६६ लाख
{ २०१२-१३ च्या असेसमेंटपासून प्राप्त रक्कम - ५६.४६ लाख

एकूण एलबीटीधारक कापड विक्रेते

नोंदणीकृत एलबीटीधारक असे ८३ कोटींची वसुली
एलबीटीधारकांकडून गेल्या आर्थिक वर्षात ८३ कोटी ४१ लाख ९१ हजार ३९७ रुपयांची वसुली झाली. यातील िनयमित भरणा करणाऱ्यांनी दिलेला कर साडे ८२ कोटी रुपये असून, दंड वा इतर कारवाईतून जमा झालेला महसूल ५६ लाख ४६ हजार रुपये आहे. आर्थिक वर्ष संपले असले तरी एलबीटीची वसुली अद्यापही सुरूच आहे.