आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Amarawati Man In Tokyo For Marathon News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टोकियोमध्ये अमरावतीकर बाळकृष्ण आकोटकरांची मॅरेथॉन धाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - बाळकृष्ण आकोटकर यांनी 42.195 कि.मी. अंतराच्या या शर्यतीत दोन तास 29 मि. 06 सेकंद वेळ काढली होती. विशेष असे, की 2012 च्या लंडन आॅलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणार्‍या रामसिंग यादवलाही मॅरेथॉनमध्ये आकोटकर यांनी नोंदवलेल्या भारतीय वेळेच्या विक्रमाला मागे टाकता आलेले नाही.
आॅलिम्पिकच्या 116 वर्षांच्या इतिहासात आजवर 13 धावकांनी मॅरेथॉनमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांपैकी वेगवान अंतर कापणार्‍यांत बाळकृष्ण यांचा तिसरा क्रमांक लागतो. शिवनाथ सिंग यांनी 1976 मध्ये मॅरेथॉन शर्यतीत देशाकडून सर्वांत वेगवान वेळेची नोंद केली होती. त्यांनी 11 वा क्रमांक पटकावला होता. मॅरेथॉनमध्ये भारताची ही सर्वोत्तम कामगिरी असल्यामुळे केंद्र सरकारने शिवनाथ सिंग यांना पुरस्कारादाखल पेट्रोलपंपाचा परवाना दिला होता.
अमरावतीच्या मातीत गेले आकोटकर यांचे बालपण
बाळकृष्ण आकोटकर यांचे वडील यादवराव एकवीरादेवीचे पुजारी असल्याने कुटुंबाचे वास्तव्य हे देवळातच होते. बाळकृष्ण यांचे चार भाऊ व दोन बहिणींचे वास्तव्य अमरावती परिसरातच आहे. बाळकृष्ण शहरातील गव्हर्न्मेंट अ‍ॅकेडमिक हायस्कूलमध्ये नववीपर्यंत शिकले. त्यानंतर खेळाडू बनण्याच्या महत्त्वाकांक्षेने झपाटलेल्या या क्रीडाप्रेमीने 1951 मध्ये सेनादलात प्रवेश मिळवला. मिलिटरी अकादमीत ते नियमित सराव करायचे. त्या वेळी सरावाची फारशी आधुनिक साधनं उपलब्ध नव्हती. मार्गदर्शक जसे सांगेल किंवा शरीराला झेपेल तसा सराव करायचो. त्यातूनच मला हे यश मिळाले होते. अशी प्रतिक्रिया आकोटकर यांनी दिली. येथेच त्यांची कारकीर्द घडली. 1980 मध्ये कॅप्टन पदावर असताना ते निवृत्त झाले.
पुण्यात वास्तव्य
अमरावतीकर आॅलिम्पिकपटू आकोटकर यांचे सध्या पुण्यात निगडी येथे वास्तव्य आहे. पुण्याच्या बालेवाडीत क्रीडासंघटक डॉ. लुंगे यांना शिवछत्रपती पुरस्कार मिळाल्यानंतर अमरावतीकर बंधू म्हणून बाळकृष्ण यांनी त्यांना निवासस्थानी बोलावून सन्मान केला होता. बालपणी बाळकृष्ण हे उत्कृष्ट कबड्डीपटू होते. प्रतिस्पर्ध्यांच्या डोक्यावरून उडी घेण्यात त्यांचा हातखंडा होता.
आॅलिम्पिक सहभागाचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष
माझ्या आॅलिम्पिक सहभागाचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. मी सर्वोत्तम वेळेचा (दोन तास 25 मि. 32.8 सेकंद) विक्रम नोंदवून आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवली होती. नोकरी व खेळ याला माझ्या दृष्टीने सारखेच महत्त्व होते.
- बाळकृष्ण आकोटकर, भारतीय आॅलिम्पिकपटू.
अंबानगरीत जन्मलेले बाळकृष्ण आकोटकर यांनी जपानची राजधानी टोकियो येथे 1964 मध्ये आयोजित आॅलिम्पिकमध्ये मॅरेथॉन शर्यतीत भारताचे प्रतिनिधित्व करून 33 वा क्रमांक पटकावला होता. अमरावतीतील ते एकमेव आॅलिम्पिकपटू आहेत.