आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमरावती - मेळघाटातील अ‍ॅम्बुलन्स 90 दिवसांपासून एकाच ठिकाणी; सेवेच्या नावाखाली पैशांची नासाडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मेळघाटातील बैरागड व सेमाडोहच्या अ‍ॅम्बुलन्स 90 दिवसांपासून एकाच ठिकाणी पडून असल्याने निगडित सहा डॉक्टर्स व चार चालकांनाही काहीही न करता वेतन देण्यात येत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
गरोदर महिलांना मदत करण्यासाठी पाठवण्यात आलेल्या या अ‍ॅम्बुलन्स तब्बल 90 दिवसांपासून एकाच ठिकाणी उभ्या आहेत. महिनाभरापूर्वी सेमाडोहच्या अ‍ॅम्बुलन्सला कॉल आला होता. मात्र, ती पोहोचण्याच्या आतच संबंधित महिलेने बाळाला जन्म दिला. यंत्रणेवर उगाच खर्च होऊ नये म्हणून ‘खोज’ संस्थेने ही माहिती आरोग्य खात्याला कळवली असून, याबाबत योग्य ती कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

रुग्णांना केव्हाही (24 तास) सेवा देता यावी म्हणून प्रत्येक अ‍ॅम्बुलन्सवर तीन डॉक्टर्स व दोन चालक, असे पाच जण असतात; परंतु या सर्वांना काहीच काम नाही, अशी स्थिती आहे. यंत्रणेने त्यांच्या कौशल्याचा योग्य वापर न करताच त्यांच्यावर खर्च करणे कितपत योग्य आहे, असा सवालही ‘खोज’ने उपस्थित केला आहे. यंत्रणा याबाबत काय निर्णय घेते, हे लवकरच कळणार आहे. मात्र, ज्या ठिकाणी रुग्णवाहिकेची गरज आहे. त्या ठिकाणी वेळीच रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याचे चित्र पाहवयास मिळते. प्रसंगी खासगी वाहनांचा वापर करावा लागतो. आदिवासींच्या आरोग्यासाठी आम्ही तत्पर आहोत असे दाखवले जात असले तरी वास्तव मात्र वेगळेच आहे.
जनतेच्या सेवार्थ केला जाणारा खर्च वाया जाऊ नये
शासकीय योजनांच्या माध्यमातून जनतेच्या सेवार्थ केला जाणारा खर्च वाया जाता कामा नये. मेळघाट हा आदिवासीबहुल विभाग आहे. त्यासाठी विशेष काहीतरी करतोय, हे दाखवण्याचा शासनाचा प्रयत्न असतो. मात्र, वास्तविकता वेगळी असल्याने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.
- अ‍ॅड. बंड्या साने, लोकाधिकार देखरेख समिती.