आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीत गतिरोधक बनलीत डोकेदुखी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शहरातीलमुख्य मार्ग तसेच आतील मार्गावर गतिरोधकांची संख्या वाढल्यामुळे शहरवासीयांची डोकेदुखी वाढली आहेत. गतिरोधकांमुळे पाठीच्या करण्याचे दुखणे वाढले आहे. त्यातच आपात्कालीन स्थितीत वाहतूक करणारे वाहन चालकही गतिरोधकांमुळे हैराण झाले आहेत.

शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहेत. सद्यस्थितीत दररोज शहरातील मार्गावर पाच हजारांपेक्षा अधिक वाहनांची वर्दळ पहायला मिळते. शहरात पूर्वी शाळा-महाविद्यालये, रुग्णालये अपघात प्रणव स्थळे अशा ठिकाणी गतिरोधक बसविण्याची पद्धत होती. मात्र, प्रशासनाद्वारे आता जागोजागी गतिरोधक बसविले जात आहेत. त्यामुळे शहरात गतिरोधकांची संख्या वाजवीपेक्षा जास्त वाढली आहे. शहरातील मुख्य मार्गासोबत आतील मार्गावरही गतिरोधकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे शहरातील असा कोणताही मार्ग नाही, जेथे गतिरोध नाहीत. गतिरोधकांमुळे मणक्याच्या त्रासाने ग्रस्त असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. गतिरोधकांमुळे अपघातही वाढले आहेत. दुर्लक्ष झाल्यास गतिरोधकांवर वाहने उसळून अपघातही घडल्याच्या घटना शहरात घडल्या आहेत. प्रशासनाने आवश्यक तिथेच गतिरोधक ठेऊन बाकी ठिकाणचे गतिरोधक त्वरित काढावेत, अशी मागणी नागरिकांच्या वतीने केली जात आहे.
अनेक समस्या आहेत
शाळा,कॉलेज, दवाखाने आदी ठिकाणी गतिरोधक असायला हवे. मात्र शहरात ठिकठिकाणी तयार करण्यात आलेल्या गतिरोधकांमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहे. दुचाकी, चारचाकी वाहनांची हालत त्यामुळे खस्ता झाली आहे. लहान मुले, गरोदर स्त्रिया, वृद्धांनाही गतिरोधकांवरून जाताना नाहक झटके बसण्याचा त्रास सहन करावा लागतो. रात्रीच्या वेही या गतिरोधकांमुळे अनेकदा अपघातही घडले आहेत
.
वाहनाच्या देखभालीच्या खर्चाचा वाढला बोजा
गतिरोधकांमुळेब्रेकशूचा खर्च वाढला आहे. सरळ रस्त्यावर अगदी लागूनच गतिरोधक समोर येतात. त्यामुळे ब्रेक मारावाच लागतो. त्यामुळे वाहनांच्या देखभालीचा खर्च वाढला आहे.
गौसअली, नागरिक.
गतिरोधकांमुळे पाठीचे दुखणे वाढले आहे
शहरातीलमार्गावरच अनेक गतिरोधक टाकण्यात आल्याने वाहन चालविताना अडथळा निर्माण होत आहे. या गतिरोधकांमुळे पाठीचा त्रास होत असल्याने कोणत्याही ठिकाणी वेळेवर पोहचू शकत नाहीत. नितीनआंजीकर, नागरिक.

रस्त्याने वाहन चालवणे झाले आहे कठीण
शहरातीलमुख्य मार्ग असो की अंतर्गत मार्ग असो, प्रत्येक ठिकाणी गतिरोधक असल्यामुळे वाहन चालविणेही कठिण झाले आहे. गतिरोधक कमी करण्याचा प्रयत्न नगरपालिकेने करायला हवे.
रवींद्रदोड, नागरिक.
वरुड शहरामध्ये ठिकठिकाणी रस्त्यांवर असे गतिरोधक दिसून येतात.
पाच हजारांपेक्षा वाहनांची अधिक संख्या
बातम्या आणखी आहेत...