आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती-नागपूर मार्गाला मिळाली आंतरराष्ट्रीय ओळख; रस्त्यावर झळकले नवीन फलक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - राष्ट्रीय महामार्गांच्या क्रमांकांचे सुसूत्रीकरण आणि अशियाई देशांच्या दळणवळणाच्या दृष्टीने आता नॅशनल हाय-वेच्या (एनएच) क्रमांकाबरोबरच अशिया हाय-वेचे (एएच) क्रमांक महामार्गावर लिहिलेले दिसत आहेत. अमरावती-नागपूरवरून जाणारा जुना ‘राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा’ आता ‘राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३’ झाला असून, ‘आशियाई महामार्ग ४६’ झाला आहे.
त्यामुळे या मार्गावर अनेक ठिकाणी आता (आशियाई हायवे) एएच ४६ असे फलक लागले आहेत. अमरावती-नागपूर हा मार्ग आता राष्ट्रीय महामार्गासोबतच आंतरराष्ट्रीय महामार्ग बनला आहे. राष्ट्रीय महामार्गांचे क्रमांक अधिक सुटसुटीत करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. त्यानुसार, देशातील अनेक राष्ट्रीय महामार्गांचे क्रमांक बदलेले आहेत. गुजरात ते पश्चिम बंगालला जोडल्या जाणारा राष्ट्रीय महामार्ग (पूर्वीचा क्रमांक सहा) हा अमरावती, नागपूरवरून जातो. आता या महामार्गाच्या क्रमांकामध्ये बदल झाला आहे.
आशियाई देशांच्या विकासासाठी

अशियाईदेशांतील परस्पर सहकार्य, लोककल्याण, आर्थिक वैज्ञानिक सहयोग, सामाजिक प्रगती, जीवनमान उंचावणे, विकसनशील देशांचे मजबुतीकरण अशा अनेक मुद्द्यांवर भारताच्या शेजारी असलेले पूर्व दक्षिण अशियाई देश एकत्र येतील. या महामार्गावरून वाहतूक केल्यास आशियाई देशांचा अधिक विकास हाच उद्देश ठेवण्यात आला असल्याचे नॅशनल हायवे ऑथरिटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या देशांमधील प्रमुख महामार्गांना ‘एएच’ असा क्रमांक असणार आहे.

असा होणार फायदा

राष्ट्रीयमहामार्गाला आंतरराष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यामुळे भविष्यात ज्या वेळी आशियाई मार्गांचा विकास होईल, त्या वेळी अमरावतीतून जाणाऱ्या या आंतरराष्ट्रीय मार्गाचाही विकास निश्चितच होईल.