आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अधिकारी, पदाधिकारी दौर्‍यावर; मनपा मात्र वार्‍यावर !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- मुंबई येथे आयोजित महिला बचत गटाच्या कार्यक्रमासाठी अधिकारी-पदाधिकारी मुंबईत असल्याने शुक्रवारी (दि. 20) महापालिकेत शुकशुकाट होता. कार्यालयात कर्मचार्‍यांची उपस्थिती कमी असल्याने कामकाज प्रभावित झाले. कामानिमित्त आलेल्या अनेक नागरिकांना आल्या पावली परतावे लागले. परिणामी, सुटीचा मूड बनल्याने कर्मचार्‍यांची उपस्थितीही तुरळक असल्याने एरव्ही गजबजलेल्या महापालिकेच्या परिसरात शुकशुकाट पसरला होता.
महापालिक आयुक्त अरुण डोंगरे मागील काही दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून आहेत. उपायुक्त रामदास सिद्धभट्टी यांची यवतमाळ येथे बदली झाल्याने त्यांचे पद रिक्त आहे. त्यांचा प्रभार उपायुक्त रमेश मवासी यांच्याकडे देण्यात आला आहे. आयुक्त, उपायुक्तांसह एकही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्यामुळे कर्मचार्‍यांची नगण्य उपस्थिती आढळून आली.
उपमहापौर नंदकिशोर वर्‍हाडे, स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल, महिला व बाल कल्याण सभापती नीलिमा काळे, गटनेते मुंबईतच आहेत. महाराष्ट्र राज्य नगर परिषद संचालनालयाच्या वतीने मुंबईतील ताज हॉटेल व वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिका क्षेत्रातील बीपीएल बचत गटातील दोनशे महिला कार्यशाळेसाठी गेल्या आहेत. नोंदणीकृत बीपीएल बचत गटातील महिलांना या कार्यशाळेसाठी नेणे बंधनकारक असताना निवडीत पक्षपात झाल्याचे निदर्शनास येत आहे. 20 दिवसांपूर्वी तयार करण्यात आलेली यादी ऐनवेळी बदलण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.