आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडीएल रेल्वे वॅगन प्रकल्पाची दिल्लीत बोलवा संयुक्त बैठक आ.डॉ. सुनील देशमुख यांचे नितीन गडकरींना साकडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अमरावती विमानतळाच्या विकासासाठी केंद्रीय परिवहन,रस्ते जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांना साकडे घालणारे आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी आता बीडीएल (भारत डायनॅमिक्स लिमीटेड) रेल्वे वॅगन दोन प्रकल्पासाठीही हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
गडकरी यांनी अलिकडेच अमरावती जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी या दोन्ही प्रकल्पाबाबतची टिपणे डॉ. देशमुख यांनी त्यांना सादर केली. दोन्ही प्रकल्पात असलेली रोजगार क्षमता त्यांची उपयोगीता स्पष्ट करीत या प्रकल्पांना वेग मिळवून देण्यासाठी गडकरी यांनी दिल्लीत बैठकी घ्याव्यात, असे डाॅ.देशमुख यांनी पत्रात म्हटले आहे.

वरील दोन्ही प्रकल्पांची मांडणी २०१०-११ मध्ये झाली असून २०११ मध्येच तत्कालीन राष्ट्रपतींच्या हस्ते बीडीएलचे भूमीपूजन झाले होते. परंतु नांदगाव पेठ एमआयडीसीत असलेल्या या कारखान्याचे चार-पाच वर्षातील काम कुंपनभिंतीच्या पलिकडेपुढे सरकले नाही. वॅगन दुरुस्ती प्रकल्पाचेसुद्धा असेच आहे. बडनेराजवळ प्रस्तावित या प्रकल्पासाठी ७७.८५ हेक्टर जमिनीची गरज आहे. त्यापैकी तब्बल ७३.६३ हेक्टर जमीन स्थानिक जिल्हा प्रशासनाने मिळवून दिली.
मात्र कुंपण भिंतीच्या निविदेपलिकडे हा प्रकल्पही पुढे सरकला नाही. त्यामुळे विदर्भातील या दोन्ही प्रकल्पांच्या मुद्द्यावर आपण स्वत: हस्तक्षेप करुन संबंधित विभागांची बैठक बोलवावी, असे पत्रात म्हटले आहे.
हस्तक्षेप करण्यासाठी दिले गडकरींना पत्र

विमानत विस्तारीकरणासाठी मी यापूर्वीच पत्र दिले आहे. दरम्यान बीडीएल वॅगन दुरुस्ती प्रकल्पासाठीही गडकरी यांनी हस्तक्षेप करावा. शेवटी विदर्भाचा प्रश्न असून केंद्र शासनातील मंत्र्यांशिवाय तो तडीस नेणे, शक्य नाही. डॉ.सुनील देशमुख, आमदार, अमरावती.

बांधकामाचे नकाशेही तयार नाहीत
बीडीएल कारखान्यासाठी नांदगावच्या एमआयडीसीत २२ लाख ४१ हजार ३५५ चौरस मीटर जागा देण्यात आली आहे. मात्र या जागेवर बांधावयाच्या इमारतीचा आराखडाही अद्याप ठरला नसून तशी कोणतीही परवानगी संबंधित यंत्रणेकडे मागण्यात आली नाही. त्यामुळे या प्रकल्पांच्या अंमलबजावणीत असणारी कासव गती आमदारांनी स्पष्ट केली असून ती बदलावी, असा आग्रह धरला आहे.