आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानतळाचा मुद्दा मुख्य सचिवांपर्यंत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - नागपुरातील मिहान विशेष सेझ प्रकल्पास पूरक म्हणून अमरावतीच्या बेलोरा विमानतळाचा विस्तार होणार आहे. या विस्तारकार्याला वेग देण्यासाठी राज्याच्या आस्थापना विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव पी. एस. मीणा सोमवारी अमरावती जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत.

मीणा हे बेलोरा विमानतळाची पाहणी करतील. बेलोरा विमानतळाचा सेझ प्रकल्पास पूरक विस्तार झाल्यास अमरावतीही उद्योजकांच्या अजेंड्यावर येऊन येथील औद्योगिक विस्तारास गती मिळेल. विमानतळाच्या विस्तारासाठी अधिग्रहित केलेल्या जागेची माहिती उपविभागीय महसूल अधिकारी प्रवीण ठाकरे सलग दोन दिवसांपासून घेत आहेत. तहसीलदार अनिल भटकर हेदेखील महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या संपर्कात आहेत. बेलोरा विमानतळाच्या जमिनीचे अधिग्रहण जवळपास पूर्ण झाले असून, मूलभूत सुविधांचा विकास करण्यासाठी टप्पे ठरवले आहेत. प्रत्येक टप्प्यातील काम मुदतीत होणे अपेक्षित आहे, परंतु जमीन अधिग्रहणापलीकडे बेलोरा विमानतळाचा मुद्दा सरकत नसल्याने मीणा हे खास याच कामासाठी अमरावतीत येत असल्याने विकासाचा मुद्दा मार्गी लागण्याची आशा आहे.

आराखडा, नकाशा तयार
विस्तारित बेलोरा विमानतळाचा नकाशा आणि आराखडा एमएडीसीने तयार केला आहे. त्याला केव्हाच मंजुरी मिळाली आहे. जसजसा राज्य सरकारकडून निधी उपलब्ध होईल, तसतसा विस्तार कार्याला वेग देणे एमएडीसीला शक्य होणार आहे.

खासगीकरणाकडे...?
अमरावतीव्यतिरिक्त शिर्डी आणि जळगाव, खान्देश येथील विमानतळ विकासाचे कामही एमएडीसीकडेच आहे. दोन्ही ठिकाणचे विस्तार कार्य पूर्ण झाल्यानंतर हे विमानतळच खासगीकरणात देण्यात आले. एमएडीसी अमरावती विमानतळाचा विकास करत असली, तरी त्याची देखभाल-दुरुस्ती एमएडीसीकडून होणे निधीअभावी शक्य दिसत नाही. त्यामुळे विस्तारानंतर हे विमानतळदेखील खासगी तत्त्वावर चालवण्यास देण्यावर राज्य सरकार विचार करीत असल्याचे संकेत आहेत.नगरसेविका फहमिदा यांच्या पतीला अटक