आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर होतेय स्वच्छ, सुंदर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शहरातील स्वच्छतेसंदर्भात महापालिका प्रशासन गांभीर्याने काम करीत असल्याचा अनुभव सध्या नागरिकांना येत आहे. मान्सूनपूर्व नाला सफाई असो की,वाॅर्डातील साचलेला कचरा, तो लवकर कसा उचलला जाईल,यासाठी प्रयत्न होत आहेत. शहरातील कचऱ्याची भीषण समस्या लक्षात घेता दै.दिव्य मराठीने विशेष अभियान राबवून या नागरी समस्येवर लोकसहभागातून कसे समाधान मिळवता येईल, याकडे नागरिकांचे प्रशासनाचे लक्ष वेधताच महापालिकेने विशेष बैठक बोलावून शहर स्वच्छतेच्या िनयोजनाचा आराखडा तयार केला. या अभियानाला सर्वच स्तरावरुन सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. शहर स्वच्छ सुंदर ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी ओळखून नागरिकही या मुद्याकडे गांर्भीर्याने पाहत आहेत.

दरम्यान, एरव्ही प्रत्येकाच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या स्वच्छतेसंदर्भात नागरिक उदासिन होते. याकडे लक्ष वेधण्यासाठी दै.दिव्य मराठीने सुरू केलेल्या स्वच्छ अमरावती,सुंदर अमरावती अभियानात स्थानिक प्रशासनासह स्वयंसेवी संस्था, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी, हॉकर्स नागरिक सक्रिय सहभाग नोंदवून आपला उस्फूर्त प्रतिसाद देत आहेत. त्यामुळेच शहर स्वच्छतेच्या अभियानाचे हे पाऊल पुढे पडत आहे.
कचरापेटीचा वाढला वापर : शहरात अस्वच्छेता कळस या संदर्भात दै. दिव्य मराठी वारंवार पाठपुरावा करीत आहे. विशेष म्हणजे, सहकारातून समाधान अभियानाच्या माध्यमातून शहर स्वच्छ सुंदर बनविण्यासाठी दिव्यमराठीने पुढाकार घेतला आहे.

स्वच्छतेच्या संदर्भात महानगरपालिका सतर्क असून पूर्वीपेक्षा कचऱ्याचे प्रमाण कमी जरी झाले नसले तरी जागोजागी पडून राहणारा कचरा सध्या शहरातून हद्दपार झाला आहे. शहरातील रस्ते, कॉलनी, मैदाने स्वच्छ होत असून नागरिक कचरापेटीचा आवर्जून वापर करतांना दिसत आहेत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, कशी आहे यंत्रणा मनपा... प्रशासनाकडून कचऱ्याची योग्य विल्हेवाट...
बातम्या आणखी आहेत...