आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Amravati Closed Today Due To Congress MLA Raosaheb Beating

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आज अमरावती बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - आमदार रावसाहेब शेखावत यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेर्धात काँग्रेस नेत्यांनी शहर बंद करण्याचा इशारा दिला. शुक्रवारी (30 ऑगस्ट) दुपारी 3 पर्यंत शहरातील सर्व व्यापार्‍यांनी बंदमध्ये सहभागी होवून सहकार्य करावे असे आवाहन शहर अध्यक्ष संजय अर्केते यांनी केला आहे. पोलिस आयुक्त अजित पाटील यांच्या समक्ष लोकप्रतिनिधीवर अशा प्रकारे हल्ला होणे म्हणजे कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे असा आरोप काँग्रेसने केला. यामुळे पोलिस आयुक्तांची तात्काळ बदली करावी या मागणीसाठी काँग्रेसने बंद पुकारला आहे. या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, रात्री उशिरापर्यंत देवी सदन येथे कॉंग्रेस कार्यकर्ते तळ ठोकून होते.

शुक्रवारी सकाळी 8.30 वाजता राजकमल चौकात काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्रीत येणार असून त्यानंतर एका मोर्चाद्वारे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यास जाणार आहे. शांततेच्या मार्गानेच हा बंद आयोजित करण्यात आला असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. पोलिस आयुक्तालयातून बाहेर आल्यानंतर आमदार शेखावत यांनी त्यांच्या घरी ‘देवी सदन’पर्यंत पायीच जाणे पसंत केले. त्यांच्या समवेत त्यांचे कार्यकर्तेदेखील घरी पोहचले.