आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amravati Collector Kiran Gite Get Prime Minister Award

जिल्हाधिकारी गित्ते यांना आज मिळणार पंतप्रधान पुरस्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पश्चिम त्रिपुराची राजधानी आगरतळा येथे राबवलेल्या आर्थिक समावेशन प्रकल्पासाठी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना दिल्लीतील नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी (दि. २१) गौरवण्यात येणार आहे. एक लाख रुपये रोख, पदक, प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

पंतप्रधान पुरस्कारासाठी निवड होणारे किरण गित्ते हे महाराष्ट्रातील एकमेव अधिकारी आहेत. राष्ट्रीय स्तरावर लोकप्रशासनात उत्कृष्ट नावीन्यपूर्ण काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना दरवर्षी २१ एप्रिलला रोजी लोकप्रशासन दिनी हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. या अंतर्गत गित्ते यांना पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्कार दिला जाईल.