आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेची 24 लाख 37 हजारांची कर वसुली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- बडनेराझोनमध्ये महापालिकेने राबवलेल्या शिबिरात 27 लाख37 हजार रुपयांची करवसुली करण्यात आली आहे. यामध्ये 15 लाख ३२ हजार रुपये रोख नऊ लाख रुपये धनादेशाच्या स्वरूपात वसूल करण्यात आले. बडनेरात राबवण्यात आलेल्या मालमत्तांचे मूल्यांकनामध्ये एकूण १४ वॉर्डांचा समावेश होता.
बडनेरा झोन अंतर्गत १४ वॉर्डांमध्ये मालमत्तेच्या मूल्यांकनास सुरुवात झाली असून, शनिवार रविवारी असे दोन दिवस हे शिबिर घेण्यात आले. पेट्रोल पंप, व्यावसायिक प्रतिष्ठाने, इमारती मूल्यांकनाच्या कक्षेत होते. ‘ऑन दी स्पॉट असेसमेंट’ होत असल्याने मालमत्ताधारकांमध्ये धास्ती आहे. सहायक आयुक्त योगेश पिठे सहायक क्षेत्रीय अधिकारी मंगेश वाटाणे यांच्या नेतृत्वात हे शिबिर घेण्यात आले, तर निरीक्षक म्हणून लक्ष्मीकांत येळगुंदे, राजेंद्र देशमुख गजानन घुगे यांनी काम पाहिले, शिबिरात संजय हरणे, निखिल अळसपुरे, संजय पातुर्डेकर, राजेश चावरे, विजय ठाेके, हफीज खान, शिवानंद साखरकर, बाळ रांगोळे तुकाराम वानखडे यांनी ही करवसुली केली.