आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायत निवडणूक : मतदान झाले शांततेत; आज फैसला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्ह्यात ५३१ ग्रामपंचायतींच्या सार्वजनिक, तर ५० ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी बुधवारी (दि. २२) मतदारांनी "ईव्हीएम'मध्ये उमेदवारांचे भाग्य बंद केले. गुरुवारी (दि. २३) तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात येणार आहेत. बुधवारी सुरवाडी येथे मतदान केल्यानंतर वृद्धेचा मृत्यू झाला, तर दाभा येथे चुकीच्या चिन्हामुळे ही निवडणूक गुरुवारी (दि. २३) होणार आहे. निवडणुकीत कोणत्या उमेदवाराचे भाग्य फळफळेल, याकडे लक्ष लागलेे आहे.
दर्यापूर तालुक्यातील४८ ग्रामपंचायती चार गट ग्रामपंचायती अशा एकूण ५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकी तालुक्यात शांततेत पार पडल्या. मात्र, गायकवाडी येथे साईनगर केंद्रावरील तसेच सासन रामपुरा, उमरी ममतदबाद, पिंपळोद येथे ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने काही निवडणूक प्रक्रिया खोळंबली होती, तर पिंपळोद येथे दोन गटात मतदानादरम्यान वादावादी झाल्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.
सकाळी साडेसात वाजता सुरू झालेल्या निवडणूक प्रक्रियेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उमरी इतबासूर येथे दोन गटांत शाब्दिक चकमक झाल्याने तणावपूर्ण शांतता होती. तालुक्यातील निवडणूक प्रक्रियेसाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. निवडणूक निरीक्षक म्हणून जबाबदारी असलेले सेल्स टॅक्स ऑफिसर गेडाम यांनी विविध भागात मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. गुरुवारी तहसील कार्यालयात सकाळी आठपासून मतमोजणीला सुरुवात होणार असून, कोण्त्या उमेदवाराचे भाग्य उजळेल, याकडे मतदार राजाचे लक्ष लागले आहे. चौकाचौकांत गुरुवारी कोणत्या उमेदवाराचे भाग्य फळफळेल, याची चर्चा सुरू आहे.
ईव्हीएममध्ये बिघाड : मतदान प्रक्रियेदरम्यान तालुक्यातील गायकवाडी येथे साईनगर केंद्र, सासन रामपुरा, उमरी ममतदबाद, पिंपळोद येथे ईव्हीएम मशीनमध्ये तांित्रक बिघाड झाल्याने काही ठिकाणी निवडणूक प्रक्रिया खोळंबली होती.

शाब्दिक चकमक, सौम्य लाठीमार : उमरीइत बासूर येथे दोन गटांत शब्दिक चकमक झाल्याने तणावपूर्ण शांतता होती, तर पिंपळोद येथे दोन गटांत झालेल्या वादावादीमुळे तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.
मतदानानंतर वृद्धेचा मृत्यू
तिवसातालुक्यातील सुरवाडी येथील हिरूबाई विनायक कोठे (८०) दुपारच्या सुमारास मतदानाचा हक्क बजावून घरी परत आल्यानंतर हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. दुपारी बारा वाजताच्या सुमारास त्या मतदानाहून परत आल्या होत्या. त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला.
वरुड तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका तीन ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका बुधवारी (दि. २२) शांततेत पार पडल्या. तालुक्यात ७० टक्के मतदान झाले. निवडणूक विभागाने १४३ मतदान केंद्रांकरिता ७०४ कर्मचारी, १७० पोलिसांचा ताफा तैनात केला होता. दोन राखीव पथकं आणि पोलिस अधिकारी कार्यरत होते. यामध्ये लिंगा, काचुर्णा आणि काटी ग्रामपंचायतींसह ७७ उमेदवार अविरोध निवडून आले.

मतदान झालेल्या ४४ ग्रामपंचायतींमध्ये एकूण ४५ हजार ६७४ पुरुष, ४० हजार ४८६ महिला मतदारांची संख्या होती. गणेशपूर जामठी येथे अनुसूचित जमाती महिला राखीवमध्ये एकही नामांकन दाखल नसल्याने मतदान झाले नाही. मतदान झालेल्या ४१ ग्रामपंचायतींमध्ये लोणी १७, इत्तमगाव ७, बेनोडा १७, गोरेगाव ७, शहापूर १, टेंभुरखेडा १३, झटामझिरी ९, गव्हाणकुंड १, बहादा ७, धनोडी ९, मालखेड ९, झोलंबा ७, करजगाव ९, पेठमांगरुळी ७, मांगरुळी ९, सातनूर ११, वाई(खुर्द) ७, पुसला १७, अमडापूर ९, राजुराबाजार १३, चिंचरगव्हाण ७, पवनी ९, गणेशपूर ९, वाठोडा ११ वडाळा ७, वघाळ ७, गाडेगाव ९, हातुर्णा ९, ढगा ७, एकदरा ९, आमनेर ११, बेसखेडा १, घोराड ७, देऊतवाडा ७, रोशणखेडा ९, कुरळी ९, सुरळी ९, चांदस , उदापूर ७, उराड ७, सावंगी ११, या ग्रामपंचायतींचा समावेश होता. या सर्व उमेदवारांचे भाग्य इव्हीएम मशीमध्ये बंद झाले आहे. त्याचा निकाल गुरुवारी (दि. २३) नगरपरिषद सांस्कृतिक भवनामध्ये जाहीर होणार असून, उमेदवाराचे लक्ष निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...