आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाडोळे यांना वित्त आरोग्य; कराळेंकडे शिक्षण, बांधकाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- जिल्हापरिषदेतील बहुप्रतीक्षित खातेवाटप शुक्रवारी पार पडलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत पूर्णत्वास गेले. त्यानुसार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश हाडोळे यांच्याकडे वित्त आरोग्य समितीचे अध्यक्षपद आले असून, गिरीश कराळे यांच्या खांद्यावर शिक्षण बांधकाम समितीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
अन्य एक सभापती अरुणा गोरले यांना कृषी पशुसंवर्धन समितीचे अध्यक्षपद देण्यात आले. अध्यक्ष निवडीनंतर मागील महिन्याच्या दोन तारखेला जिल्हा परिषदेच्या चारही सभापतींची निवडणूक आटोपली. समाजकल्याण आणि महिला बालविकास या दोन समित्यांचे सभापती थेट निवडायचे असल्याने या पदांवर सरिता मकेश्वर वृषाली विघे यांची निवड झाली.
अन्य दोन सभापती म्हणून मिरीश कराळे अरुणा गोरलेंची निवड झाली. मात्र, खाटेवाटप व्हायचे होते. याशिवाय, जि. पं. उपाध्यक्ष मिळून तिघांमध्ये वित्त (अर्थ), आरोग्य, शिक्षण, बांधकाम, कृषी पशुसंवर्धन, ही सहा खाती विभागून द्यावी लागतात. शुक्रवारच्या बैठकीत तेही पार पडले. त्यामुळे आता चारही सभापतींना आपापली खाती मिळाली असून, ते आपापल्या विभागात स्थानापन्न झाले आहेत.
सभापतींच्या निवड बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सतीश उईके होते, तर सभागृहाच माजी अध्यक्ष जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख उपस्थित होते. प्रशासनातर्फे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक केईएम अहमद यांनी कामकाज सांभाळले.