आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती विभागावर घोंगावतेय पुन्हा दुबार पेरणीचे संकट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- विभागातमुसळधार कोसळलेल्या पावसाने सध्या दडी मारली असून, पुढील आठ दिवसांत पाऊस आल्यास झालेल्या पेरण्याही अडचणीत येऊन दुबारचे संकट शेतकऱ्यांच्या डोक्यावर घोंगावत आहे. मागील वर्षीच्या फटक्याने धास्तावलेला शेतकरी पावसाच्या दडीमुळे कमालीचे हादरले असून, बागायत पट्ट्यात मिळेल त्या साधनाने शेतकरी पिके जगवण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहे.
मागील वर्षी खरीप हंगामात पावसाअभावी तर रब्बी हंगामात गारपीट अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसानझाले होते. या धक्क्यातून सावरण्यासाठी या वर्षीच्या हंगामात पुन्हा शेतकरी उभा राहण्याच्या प्रयत्नात होता. दरम्यान, विभागात मृग नक्षत्रातच सरासरीच्या तुलनेत १४० मि.मी. असा दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारला होता. मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी महिनाभर आधीच पेरणीयोग्य पाऊस आला. त्यामुळे सततच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्याही रखडल्या होत्या.
पाऊस थांबल्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरण्या सुरू केल्या. विभागात आतापर्यंत ३९ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. या पेरण्यांवर पाऊस आवश्यक होता. परंतु, पेरण्या झाल्या तेव्हापासून पावसाने दडी मारली आहे. तरीही जमिनीत भरपूर ओलावा असल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या सुरूच ठेवल्या होत्या. परंतु, सध्या पावसाने दडी मारली असून, त्यातच तापमान कमालीचे वाढले आहे. त्यामुळे उगवलेली पिके अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील आठ दिवस पाऊस आल्यास बहुतांश शेतकऱ्यांवर दुबारचे संकट येण्याची शक्यता कृषी विभागाच्या वतीने व्यक्त केली जात आहे.
जिल्हानिहायपेरणीची टक्केवारी
बुलडाणा ९६ ४६
अकोला ८६ २८
वाशीम ८० १८ ६८
अमरावती ८४ ११ १९
यवतमाळ ९० ५० ४२

दुबारचे संकट
पाचएकरात कपाशी पेरली होती. मुसळधार पावसाने पन्नास टक्क्याच्या वर कपाशी दडपली. उर्वरित निघालेली उन्हामुळे कोमेजली. त्यामुळे पुन्हा दुबारचे संकट आले आहे. अमोलश्रीराव, शेतकरी
पाऊस गायब
अडीचएकर कोरडवाहू शेतात तूर, कपाशी पेरली होती. परंतु, पाऊसच आल्याने मोठ्या प्रमाणात खांडण्या आल्याने पुन्हा दुबार पेरणी करावी लागणार आहे. पंकजअजमिरे, शेतकरी
कृषी विभाग सज्ज
सध्यापिकांची स्थिती समाधानकारक आहे. आपत्कालीन स्थिती उद््भवल्यास कृषी विभागाच्या वतीने आवश्यक तयारी करण्यात आली आहे. शू.रा. सरदार, विभागीयकृषी सहसंचालक
पेरण्या रोखल्या : पावसाच्यादडीमुळे विभागातील कोरडवाहू पट्ट्यातील अमरावती अकोला जिल्ह्यातील पेरण्या शेतकऱ्यांनी रोखून ठेवल्या आहेत. सिंचनाची सोय नसल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवून धोका टाळला आहे. परंतु, पेरण्या उशिरा झाल्यास पुन्हा अल्प उत्पादनाचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दुपारी पिके टाकतात मान
वातावरणातकमालीचा उकाडा असल्यामुळे अंकुरणारे कोंब कोमेजत आहेत. त्यातच पावसाअभावी निघणाऱ्या कोंबांना कुरतडणाऱ्या वाण्या, खुरपडा आदी कीटक पक्ष्यांचा जबर धोका निर्माण झाला असून, मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होत आहे. किडींपासून पिकांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना आतापासूनच फवारणीचा भुर्दंड झेलावा लागत असल्याचे चित्र शिवारात दिसून येत आहे. सिंचनाची सोय असलेली पिकेही दुपारी मान टाकत असून, कोरडवाहू शेतातील पिकांची गंभीर अवस्था निर्माण झाली आहे.