आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती ‘स्मार्ट’ होणारच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- अत्यंत महत्वाकांक्षी योजना असलेल्या ‘स्मार्ट सिटी’मध्ये अमरावतीचा समावेश होणारच, असा आशावाद महापौर आयुक्तांनी संयुक्तपणे व्यक्त केला आहे. दिल्ली येथील कार्यशाळा आटोपून मंगळवारी सकाळीच आयुक्तांचे शहरागमन झाले. त्यानंतर त्यांनी हा दावा केला असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरु झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रातील दहा निवडक शहरांमध्ये अमरावतीचा समावेश असून हे शहर स्मार्ट होणारच अशी वाच्यता पालकमंत्री प्रवीण पोटे दस्तूरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी केली होती. त्यामुळे समस्त अमरावतीकरांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु दोन दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या कार्यशाळेत अमरावतीचा नामोल्लेखही झाला नाही, अशी माहिती बाहेर आल्याने एक मोठे प्रश्नचिन्ह उभे ठाकले होते.महापौर आयुक्तांनी हीच कोंडी फोडली अाहे.
उर्वरितपान
काय आहे स्मार्ट सिटी
स्मार्टिसटी म्हणजे दुसरे तिसरे काही नसून नागरी समस्या सोडविणारी अच्युत्तम व्यवस्था असे ढोबळ गणीत मांडले जाते. अर्थात तशी प्रणाली तयार करण्यासाठी शहरातील पायाभूत सोयीही अत्यंत उत्तम असाव्या लागतात. त्यामुळे महापािलकेला स्वत:चे स्रोत वाढवून चांगले रस्ते, चांगल्या इमारती, एकसमान करप्रणाली तयार करण्यासोबतच शहराचे सांस्कृतिक शैक्षणीक वैभवही वाढवावे लागणार आहे.
प्रस्तावावर काम सुरू
दिल्लीतीलकार्यशाळेला देशभरातील विविध महापािलकांचे महापौर आयुक्त उपस्थित होते. त्यांच्यासमोर स्मार्ट सिटीची विस्तृत मांडणी करण्यात आली. दरम्यान आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी तेथे प्राप्त झालेला ‘डाटा’ दोन दिवस आधीच नोडल ऑफीसर असलेले सहायक आयुक्त राहुल ओगले यांना पुरविला असून त्यानुसार प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.
स्मार्ट सिटी होणारच
स्मार्टिसटीच्यादृष्टीने आवश्यक असलेला प्रवास अमरावतीने सुरु केला आहे. यामध्ये प्रशासन पदािधकारी असा दोघांचाही समावेश आहे. जेवढी पावले प्रशासन टाकेल, तेवढीच लोकप्रतिनिधीही टाकतील, याचा मला विश्वास आहे. त्यामुळे भविष्यात अमरावती शहर हे स्मार्ट होणारच. चंद्रकांत गुडेवार, आयुक्त, मनपा. अमरावती.