आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावती- किरणनगर पोटनिवडणुकीत रविवारी प्रभागातील 16 केंद्रांवर 55.69 टक्के मतदान झाले. आठ उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले असून, नव्या नगरसेवकाच्या भाग्याचा फैसला सोमवारी होणार आहे.
किरणनगरातील नरसम्मा महाविद्यालयासह सर्वच केंद्रांवर मतदारांनी सकाळपासून मतदानासाठी हजेरी लावली. सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख नेते मतदान केंद्रांवर कार्यकर्त्यांसह दिसून आले. मतदान केंद्र असलेल्या ठिकाणाला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. सरस्वती विद्यामंदिर, विद्यालक्ष्मी प्राथमिक शाळा मतदान केंद्राचे ठिकाण असल्याने तेथे येणार्या मार्गांवर बॅरिकेट्स लावण्यात आले होते. सेनेच्या ज्योती चौधरी, अपक्ष राजेंद्र देशमुख, अपक्ष मंदा गजभिये, भाजपचे दीपक खैरकर, राष्ट्रवादीचे मिलिंद मानकर, बसपाचे दीपक पाटील, अपक्ष किरण शहारे, महाराष्ट्र स्वाभिमान कॉँग्रेसचे नीळकंठ ठवळी आदी आठ उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले.
महिला 3,308
पुरुष 3,650
एकूण 6,958
दीड तासात निकाल
नेहरू मैदान येथील महापालिका शाळेमध्ये मतमोजणी होणार आहे. सकाळी 9 वाजेपासून मतगणना आरंभ होईल. त्यानंतर दीड तासांमध्येच निकाल घोषित केला जाणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी जे. बी. आपले निकाल घोषित करतील.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.