आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीत १० हजार व्यापाऱ्यांना एलबीटीची नोटीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - स्थानिक संस्था करास बगल देणाऱ्या शहरातील तब्बल १० हजार व्यापाऱ्यांना महापालिकेकडून नोटीस दिली जात आहे. नोटीस दिल्यानंतर देखील प्रतिसाद देणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती रुळावर आणण्यासाठी एलबीटी वसूलीसाठी ‘सोलापूर पॅटर्न’ राबविला जाणार आहे. त्याअनुषंगाने आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी बुधवारी (दि. २४) दहा प्रतिष्ठानांची पाहणी केली. शासनाकडून ऑगस्टमध्ये एलबीटी बंद करण्याची घोषणा केल्याने महापालिकेचे उत्पन्न फार कमी झाले आहे.
व्यापाऱ्यांचा एलबीटी भरण्यास प्रतिसाद मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनाची अडचण झाली अाहे. तीन महिन्यांचे वेतन थकल्याने आयुक्त स्वत:च मैदानात उतरले आहेत. मागील तीन वर्षांपासून एलबीटी भरण्यास हुलकावणी देणाऱ्या प्रतिष्ठानांची आयुक्तांनी भेटी दिल्या. स्थानिक बापट चौकातून आयुक्तांनी आरंभ केलेली तपासणी मोहिम गाडगे नगरपर्यंत करण्यात आली. कच्चा बिलावर साहित्य आणत एलबीटीचा भरणा करणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या मोठी आहे. अश्या प्रतिष्ठानांना आयुक्तांनी भेटी देत एलबीटीचा भरणा करण्यासोबत आवाहन केले. कच्च्या बिलावर होणाऱ्या व्यापाऱ्याचा एलबीटी देखील ३१ जुलै १५ च्या आत भरण्याबाबत त्यांनी सूचना केल्या.
अभय योजने अंतर्गत व्यापाऱ्यांना लाभ घेता येणार आहे. मात्र ३१ जुलै १५ ची डेडलाइन पाळणाऱ्या व्यापाऱ्यांवर नियमानूसार कारवाई केली जाणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. त्यामध्ये कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. यावेळी उपायुक्त विनायक औगड, सहा. आयुक्त मदन तांबेकर, योगेश पीठे, अरविंद पाटील, अधीक्षक सुनील पकडे, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, सहा. पोलिस निरीक्षक खराटे यांच्यासह निरीक्षक उपस्थित होते.

या प्रतिष्ठानांची तपासणी
*एमिस्टर फॅशन -दारूमल बत्रा
*जय भोले केंद्र -गुरू बख्तसिंग
*डि.व्ही. क्रिएशन -नेहा तलडा
*डि.व्ही. अपेरिअल -दिपक तलडा
*शेतकरी हार्डवेअर -राजू राठी
*कॅश मार्केटींग राजेश -अमनानी
*आशिर्वाद प्लायवूड -सत्यप्रकाश हरवानी
*रंगोली वाईन -नितीन देशमुख
*नॅशनल एजन्सी -म. अशरफी सिद्दीकी
*विरल प्लायवुड -अमृत पटेल