आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amravati Lok Sabha Constituency, Latest News In Divya Marathi

खोडकेंची तटस्थता; बूब यांच्या माघारीमुळे निवडणुकीत रंगत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत दिनेश बूब यांनी घेतलेली माघार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार नवनीत राणा यांचा प्रचार न करण्याच्या संजय खोडके यांच्या तटस्थतेमुळे रंगत चढली आहे.
राणा यांना उमेदवारी दिल्याने विरोधात उभा ठाकलेला संजय खोडकेंचा 21 नगरसेवकांचा गट, राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्यामुळे भारिप-बहुजन महासंघाच्या पाठिंब्याने रिपाइंतर्फे लढणारे डॉ. राजेंद्र गवई, ऐनवेळी बहुजन समाज पक्षाने उद्योजक गुणवंत देवपारे यांना बहाल केलेली उमेदवारी आणि शिवसेना-भाजप-रिपाइं (आठवले गट) या महायुतीतर्फे निवडणुकीच्या आखाड्यात दुसर्‍यांदा उतरलेले खासदार आनंदराव अडसूळ असे राजकीय चित्र अमरावती लोकसभा मतदारसंघात रंगले आहे. या चार उमेदवारांव्यतिरिक्त आम आदमी पार्टीच्या प्रा. भावना वासनिकही रिगंणात आहेत.
शिवसेना-भाजपसोबतचा रामदास आठवले यांचा रिपाइं, तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीपासून दुरावलेला रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई यांचा परंपरागत मित्रपक्ष रिपाइं यांच्यातील मतविभाजनाचा फायदा किंवा तोटा कुणाला होणार, यावरही विजयाचे समीकरण अवलंबून आहे. आजपर्यंतच्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला आंबेडकरी विचारांच्या पक्षांचा फायदाच झाला आहे. मात्र, या निवडणुकीत रा. सू. गवई यांचा रिपाइं काँग्रेस-राष्ट्रवादी दोहोंपासून दुरावला आहे. अँड. प्रकाश आंबेडकरांच्या भारिप-बमसंने ऐनवेळी डॉ. गवई यांच्या रिपाइंसोबत हातमिळवणी केल्याने चुरस निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेश महासचिव संजय खोडके यांनी शरद पवारांशी चर्चेनंतरच भूमिका घेण्याचे जाहीर केले आहे. तर, राष्ट्रवादीकडून उमेदवारी मागणारे शिवसेनेचे माजी शहरप्रमुख आणि अपक्ष नगरसेवक दिनेश बूब यांनीही लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
उद्धव ठाकरेंशी चर्चा
राजकीय पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाल्यासच लोकसभा लढवण्याचा मानस होता. अपक्ष लढणारच नव्हतो. म्हणून अर्ज दाखल केला नाही. याबाबत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. दिनेश बूब, अपक्ष नगरसेवक