आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता ‘कचरा’ पेटणार; अडीचशे टन कचरा शहरातच पडून; आंदोलक ठाम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- कचराडेपो इतरत्र हलवण्याच्या मागणीसाठी सुरू होणाऱ्या आंदोलनाचा धाक एवढा होता, की मनपाने कचऱ्याचा एकही ट्रक मंगळवारी धावू दिला नाही. दुसरीकडे ट्रक अडवण्याच्या मागणीसाठी एकत्र आलेले नागरिक दिवसभर खोलापुरी गेट पोलिस ठाण्याच्या बाजूला तळ ठोकून बसले होते. ट्रक अडवण्याची वेळ आल्यामुळे त्यांनी त्या भागात फिरून जनजागरण केले. त्यामुळे बुधवारपासून हे आंदोलन आणखी तीव्र होणार आहे.
कचरा डेपो शहराच्या सीमेपासून किमान पाच किलोमीटर अंतरावर असावा, असा शासकीय िनयम आहे. मात्र, सध्याची जागा या िनयमाचे उल्लंघन करणारी असल्याने तो दुसरीकडे हलवावा, अशी आंदोनलनकर्त्यांची मागणी आहे. हनुमाननगर, महाजनपुरा, आनंदनगर, लालखडी, इतवारा बाजार, पठाणपुरा, हबीबनगर आदी भागांतील नागरिकांनी तशी भूमिका घेतली असून, नगरसेवक प्रवीण हरमकर, स्थायी समितीचे माजी सभापती गफ्फार राराणी, माजी नगरसेवक बबनराव रडके, पर्यावरणप्रेमी विलास पवार आदींनी या लढ्याचे नेतृत्व स्वीकारले आहे. दरम्यान, अामदार सुनील देशमुख यांनी या प्रश्नी मंगळवारी अांदाेलकांची भेट घेत त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली. कंपाेस्ट डेपाेचा हा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पाेहचवण्याचे अाश्वासन त्यांनी आंदोलनकर्त्यांना िदले अाहे.
या मागणीसाठी गेल्या अनेक िदवसांपासून त्यांनी पालिका आयुक्तांसह महापौर इतर पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. थेट आयुक्तांना पत्रही िलहिले. मात्र, त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळला नाही. त्यामुळे कचरा डेपोवर जाणारे ट्रक अडवण्याचा इशारा देण्यात आला होता. परंतु पालिकेने घाबरून जाऊन ट्रकच पाठवला नसल्याने प्रत्यक्ष आंदोलनाची वेळच उद््भवली नाही.प्रदूषण िनयंत्रण मंडळाची भूमिकाही संशयास्पद : कचराडेपोला िवरोध करणाऱ्यांनी टोकाची भूमिका घेतल्यामुळे या मुद्द्याशी संबंधित सगळेच पैलू पडताळून पाहिले जात आहेत. या क्रमात महाराष्ट्र प्रदूषण िनयंत्रण मंडळाची भूमिका संशयास्पद असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जी जागा शहराला खेटून आहे, त्या जागेवर कचरा डेपोला परवानगी िदलीच कशी, असा तज्ज्ञांचा प्रश्न आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी त्यांनीही ‘खेळ’ चालवल्याचे स्पष्ट झाले आहे.
मनपा आयुक्त हतबल; दुपारनंतर घेतला आढावा
शहरातीलकचरा जागीच पडून राहिल्याने मनपा आयुक्त कमालीचे िचंताग्रस्त झाले आहेत. आंदोलनाच्या भीतीमुळे कचरा डेपोत ट्रकच पाठवू नये, अशी ‘प्रोअॅक्टिव्ह’भूमिका त्यांनी घेतली खरी; परंतु ती जास्त िदवस कायम ठेवता येत नाही. दरम्यान, आज दुपारी एक महत्त्वाची बैठक सोडून त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवले होते. स्थिती निवळली असेल, तर कचऱ्याचे ट्रक डेपाेत पाठवण्याचा त्यांचा विचार होता. परंतु परिस्थितीमुळे तसे झाले नाही.
शहरात दररोज िनघतो अडीचशे टन कचरा
शहरातूनदररोज सरासरी अडीचशे टन कचरा वाहून नेला जातो. तो आणखी काही िदवस शहरातच राहिला, तर अख्ख्या अमरावतीचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती आहे. त्यामुळे हा गुंता सोडवणे आवश्यक झाले असून, मनपा प्रशासनाने त्यासाठीची धावपळ सुरू केली.
पोलिसांची दडपशाही
नागरिकांनीआंदोलनात सहभागी होऊ नये म्हणून पोलिसांनी सोमवारी रात्रीच काही कार्यकर्त्यांना लेखी ताकीद दिली होती. पोलिसांची ही कृती नागरिकांच्या न्याय्य हक्कांविरुद्ध असून त्यांचे अभिव्यक्त स्वातंत्र्य नाकारणारी असल्याची ितखट प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. पोलिसांच्या या दडपशाहीविरुद्ध मानवाधिकार आयोगाकडे जाण्याचीही आंदोलनकर्त्यांची तयारी आहे.
खोलापुरी गेट ठाणेदाराने बजावलेली नोटीस
कचऱ्याचे ट्रक अडवण्यासाठी खोलापुरी गेट पोलिस स्टेशन चौकात अांदाेलक माेठ्या प्रमाणावर एकत्रित झाले होते.कोणत्याही आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्था बिघडत असेल, तर पोलिस नोटिस बजावते. परिस्थिती बिघडल्यास आंदोलकांविरुद्ध कोणत्या कलमान्वये कारवाई होऊ शकते, याची पूर्व कल्पना आंदोलकांना देण्यासाठी ही पोिलस िवभागाकडून पाठवली जाणारी ही नोटिस असते. त्यामुळे आम्ही नियमानुसार आंदोलकांना ही नोटिस बजावली आहे. तसेच आंदोलनामुळे परिस्थिती हाताबाहेर गेल्यास होणाऱ्या कारवाईसंबंधी अवगत केले आहे.
अशोककळमकर, सहायक पोलिस आयुक्त.
पोलिसांनी सुरू केलेली दडपशाही झुगारून हा लढा आणखी तीव्र करण्याची तयारी आम्ही करीत आहोत. आमचा लढा अंबागेटच्या आतील जनजीवन शाबूत ठेवण्यासाठीचा आहे. मनपा कचरा उचलण्याची भूमिका घेऊन अख्ख्या शहरास वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत आहे. याविरुद्ध सर्वांनीच आवाज बुलंद केला पाहिजे. प्रवीणहरमकर, िशवसेना नगरसेवक.