आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंपोस्ट डेपोविरोधात सामान्यांचा एल्गार, आजपासून अडवणार कच-याचे ट्रक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शहराला अगदी खेटून सुरू असलेल्या कंपोस्ट डेपोला विरोध करणाऱ्यांच्या भावना तीव्र झाल्या असून, उद्यापासून (मंगळवार) कचऱ्याचे ट्रक अडवण्याची घोषणा करण्यात आली आहे. या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मनपाने सोमवारी गटनेत्यांची बैठक बोलावली होती; परंतु काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या घाईमुळे ही बैठक अनिर्णीत राहिली. परिणामी, मंगळवारपासूनचे आंदोलन अटळ बनले आहे.
शहराच्या पश्चिम सीमेला सुकळी (वनारसी) येथे असलेला कंपोस्ट डेपो अतिशय गंभीर िस्थतीत पोहोचला आहे. त्यामुळे तो तेथून स्थानांतरित केला जावा, अशी त्या भागातील नागरिकांसह शहरातील पर्यावरणवाद्यांची मागणी आहे. परंतु तो तेथून हलवणे तर दूर, कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मनपाने त्याच िठकाणी कचऱ्यातून खतनिर्मितीचा नवा प्रकल्प प्रस्तावित केला आहे. त्यामुळे अंबागेटच्या आतील हनुमानगर, बुधवारा, दहीसाथ, लालखडी, चमननगर, इतवारा बाजार, पठाणपुरा, हबीबनगर, अल िहलाल कॉलनी, ट्रान्सपोर्टनगर, महाजनपुरा, आनंदनगर, दत्तूवाडी आदी भागांतील रहिवाशांच्या भावना तीव्र झाल्या असून, आम्हाला या कचऱ्यातून काढा, अशी आर्जवे त्यांनी केली. यासाठी मनपा आयुक्त महापौरांना िनवेदनही देण्यात आले हाेते.
^सध्याचा कंपोस्ट डेपो ‘ओव्हर फ्लो’ झाला आहे. त्या िठकाणी कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती प्रकल्प उभारणे आवश्यक आहे. नव्हे, सर्वोच्च न्यायालयानेच तशी तंबीच िदली आहे. नाही तर माझ्यासकट सर्वांनाच फौजदारी कारवाईचा सामना करावा लागला असता. आता मध्येच जागा बदलवायचे ठरवल्यास न्यायालय सरकार गंभीर ताशेरे ओढेल. त्यामुळे जागा बदलणे कठीण आहे. नव्या जागेसाठी अनेक िवभागांच्या एनओसी िमळवणेे कठीण आहे. अरुणडोंगरे, आयुक्त, महापालिका, अमरावती.
अनेक भागांत गायरान जमिनी (इ- क्लास) आहेत. स्वत: महापािलकेनेच यापूर्वी झोननिहाय पाच जागा आरक्षित करून तेथे कंपोस्ट डेपो उभारण्याचे ठरवले होते. त्या जागा शहरापासून दूर असल्याने त्या िठकाणी कंपोस्ट डेपो होऊ शकतो. जागा शोधून देण्यात आम्ही मनपला मदत करू. बबनरावरडके, माजी नगरसेवक, अमरावती.