आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amravati Municipal Corporation News In Marathi, Session Court, Divya Marathi

मनपा कार्यालयावर जप्तीची कुर्‍हाड..!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आदेशानंतर महानगरपालिका कार्यालयावर मंगळवारी (दि. 15) जप्तीची नामुष्की ओढवली आहे. आठ वर्षांपूर्वीच्या अपघात प्रकरणात भरपाईची रक्कम देण्यास टाळाटाळ होत असल्याने ही कारवाई करण्यात येणार आहे.


प्रशांतनगर चौकात 2007 मध्ये मनपाच्या एम.एच. 27 डी. 1075 क्रमांकाच्या वाहनाने विजय कॉलनीतील रहिवासी गजानन दामोदर काळे यांच्या दुचाकीला धडक दिली होती. परिवहन कार्यालयात या वाहनाचे मनपा उपायुक्तांच्या नावे रजिस्र्ट्ेशन आहे. अपघाताच्या वेळी नारायण लक्ष्मण भांडे हे वाहन चालवत होते. काळे यांनी याबाबत तक्रार केल्यानंतर भांडे यांच्याविरुद्ध 289, 337, 338, 427 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणामध्ये अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश भोसले यांच्या न्यायालयाने निर्णय दिला. नुकसानभरपाई म्हणून तात्पुरते 25 हजार रुपये आणि 2008 पासून साडेसात टक्के व्याज अशी एकूण 40 हजारांची रक्कम देण्याचे आदेशात नमूद आहे. दावा क्रमांक 28/2008 या प्रकरणामध्ये ही रक्कम देत तात्पुरता दिलासा देण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. प्रकरण अद्याप न्यायालयात सुरू असल्याची माहिती अँड. देशमुख यांच्याकडून प्राप्त झाली आहे.