आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amravati Municipal Corporation Now Starts Collages

अमरावती महापालिका होणार आता ‘कॉलेज गोइंग’!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - प्राथमिक पूर्वप्राथमिक शिक्षणात इंग्रजी भाषेचा अंतर्भाव करणाऱ्या महापालिकेच्या शिक्षण विभागाने आणखी एक दमदार पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अमलात आल्यास मनपा ‘कॉलेज गोइंग’ होणार असून, तीन कनिष्ठ महाविद्यालये उदयास येणार आहेत.
मनपाच्या शिक्षण विभागाने तसा प्रस्ताव तयार केला असून, अंतिम मान्यतेसाठी तो शासनाकडेही पाठवला आहे. उत्तुंग शाळा इमारती, सुयोग्य परिसर इतर पायाभूत सुविधांची उपलब्धता ही मनपाची बलस्थाने आहेत. त्या आधारावर आम्ही तीन कनिष्ठ महाविद्यालये (ज्युनिअर कॉलेज) चालवू शकतो, असे मनपाच्या शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.

जिल्ह्यात एक महापालिका आणि दहा नगरपालिका आहेत. महापालिका ही नगरपालिकांपेक्षा जास्त बळकट समजली जाते. मात्र, तुलनेने कमकुवत ग्रामीण भागातील काही नगरपालिकांनी स्वत:ची महाविद्यालये, तंत्रनिकेतने (पॉलीटेक्निक) आयटीआय सुरू केली आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेचा हा प्रयोग म्हणजे उशिरा सुचलेली कल्पना आहे. परंतु उशिरा का होईना, कॉलेज व्हावे म्हणून शासन-प्रशासन अशा दोन्ही पातळींवर एकमत झाले असून, शासनाने त्यास मान्यता द्यावी, अशी लोकप्रतिनिधींचीही मागणी आहे.

कॉलेजचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला
उपलब्धपायाभूत सुविधा लक्षात घेता मनपाला तीन कनिष्ठ महाविद्यालये चालवणे शक्य आहे. त्यामुळे तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवला अाहे. त्याला मान्यता मिळाल्यास मनपाचा शिक्षण विभाग आणखी बळकट होईल. याबाबत लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. अरुणडोंगरे, आयुक्त, महापालिका, अमरावती.

‘माध्यमिक’चे कोटी
माध्यमिकच्यापाचही शाळांना शासनाचा शंभर टक्के निधी मिळतो. गेल्या काही काळापासून या शाळांचे कोटींचे अनुदान शासनाकडे अडकले आहे. या रकमेच्या मागणीसाठी मनपाने पत्रव्यवहारही केला आहे; परंतु अद्याप ही रक्कम मिळाली नाही. त्यामुळे शिक्षण विभाग अडचणीत आला अाहे. या मुद्द्यासाठी शासनाची भेट घेतली जाणार आहे.

६६ शाळांमधून शिक्षादान
महापालिकेचास्वतंत्र शिक्षण विभाग आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांप्रमाणेच महापालिकेतही शिक्षणाधिकारी आणि त्यांच्या कार्यालयाची रचना आहे. ६१ प्राथमिक पाच माध्यमिक अशा ६६ शाळांमधून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षादान केले जाते. मराठी,हिंदी, उर्दू, इंग्रजी अशा भाषांमधून या शाळा चालतात,अशी माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली.

१२ शाळांमध्ये आहे ‘ई-लर्निंग’ सुविधा
मनपाद्वारेचालवल्या जाणाऱ्या ६६ शाळांपैकी एक डझन शाळांमध्ये ‘ई-लर्निंग’ची सोय उपलब्ध आहे. नजीकच्या काळात आणखी काही शाळांमध्ये ही सोय उपलब्ध करून देण्याची मनपाची तयारी असून, शिक्षणाचे जाळे सर्वदूर विस्तारावे ही त्यामागची भूमिका आहे. आयुक्त शिक्षणाधिकारी आणि शिक्षण समितीने संयुक्तपणे हा प्रयत्न चालवला आहे.